Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Haryana Assembly Election : कुस्तीपटू विनेश फोगटसमोर 'आप'च्या लेडी खलीचं आव्हान!

Haryana Assembly Election 2024 :हरियाना विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विनेश फोगाट हिनं जुलाना मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी दाखल झाल्यानंतर तिनं आपला विजयाचा इरादा पक्का केला तर दुसरीकडं आम आदमी पक्षानंही उमेदवारी जाहीर करत जुलानामधूनच द ग्रेट खलीची शिष्या आणि लेडी खली नावाने ओळखल्या जाणाऱ्या कविता दलाल हिला तिकीट दिलं आहे. कवित दलाल ही डब्यूडब्यूई चॅम्पियन आहे.

हरियाणातील विधानसभा निवडणुकीचं वातावरण आता जोरात असून कुणाची हवा आहे हे मात्र स्पष्ट होण्यास अवधी लागणार आहे. येत्या ऑक्टोबरला तिथं मतदान आहे. निवडणुकीसाठी सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर होत आहेत. जिंद जिल्ह्यातील जुलाना मतदारसंघ विशेष चर्चेत आहे. या ठिकाणी काँग्रेसनं प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगट हिला उमेदवारी दिली तर भाजपनं योगेश बैरागी यांच्यावर विश्वास दाखवलाय. कोण आहेत हे उमेदवार आणि काय आहेत त्यांच्या योजना? चला जाणून घेऊ या.

Haryana Assembly Election 2024


ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणारी विनेश फोगट आता राजकारणाच्या आखाड्यात उतरलीय. काँग्रेसनं तिला जिंद‌ जिल्ह्यातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. विनेशनं यापूर्वी कुस्तीच्या मैदानात भारतासाठी अभिमानास्पद विजय मिळवलायमात्र यावेळी तिची चुरस थोडी वेगळी म्हणजे राजकीय आहे.

दोन कुस्तीपटूंत लढत

कविता दलाल या आम आदमी पक्षाकडून हरियानातील जुलाना मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहे. तीही व्यावसायिक कुस्तीपटू असल्यानं जुलाना मतदारसंघात कुस्तीचा आखाडा आणि राजकारणाचा आखाडा असे दोन आखाडे तयार झाले आहेत, त्यात कोण जिंकेल हे काळ ठरवणार आहे. तर दुसरीकडं भाजपचे योगेश बैरागीही चांगलेच आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

भाजप उमेदवार कॅप्टन योगेश बैरागींचं आव्हान

भाजपनं पस्तीस वर्षीय कॅप्टन योगेश बैरागी यांना जुलाना मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. योगेश बैरागी यांनी एअर इंडियाच्या सीनियर कॅप्टन पदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला आहे ते हरियाणा भाजपच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला आदर्श मानतात.

योगेश बैरागी यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर मतदारांना विनंती केली आहे की, मला सेवेची संधी द्यावी. ते जुलाना मतदारसंघात विकास व बंधुभावाच्या क्रांतीचा आदर्श ठेवण्याचे आश्वासन देत आहेत. ते म्हणाले, जुलानामध्ये माझा विकास आणि बंधुभावाचा आदर्श राहील.

योगेश बैरागी यांनी काँग्रेसच्या विनेश फोगट हिच्याबद्दल आदर व्यक्त केलाय. ती आमच्या बहिणीसारखी आहे, तिने देशाचा गौरव वाढवला आहे. मात्र आता ती काँग्रेसची उमेदवार आहे आणि माझं कर्तव्य पक्षाला विजय मिळवून देण्याचं आहे. एकूणच काय तर आता जुलाना मतदारसंघात ही लढत आणखीनच रंगणार आहे. एका बाजूला कुस्तीपटू विनेश फोगट असून, दुसऱ्या बाजूला भाजपचे कॅप्टन योगेश बैरागी. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे 5 ऑक्टोबर नंतर कळेलच. परंतु, एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जुलाना मतदारसंघातील मतदारांसाठी हा निवडणुकीचा काळ खूप महत्त्वाचा असणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+