Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'झाडूचे बटण दाबा मोफत वीज, चांगल्या शाळा अन् रुग्णालये मिळवा' 'आप'चे हरियाणाच्या जनतेला मोठे आश्वासन

Haryana Assembly Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ तीन दिवस उरले असून, या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने (आप) मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. आज मनीष सिसोदिया यांनी पानिपतमध्ये रोड शो काढला आणि लोकांना संबोधित केले.

संपूर्ण मार्गात, सिसोदिया लोकांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी ठिकठिकाणी थांबले. यावेळी लोकांनीही त्यांना अभिवादन केले, दरम्यान त्यांनी रोड शोदरम्यान पानिपतव येथे त्यांनी भाजपवर उघडपणे हल्लाबोल केला.

Haryana Assembly Election 2024

नेमके काय म्हणाले मनीष सिसोदीया?

मनीष सिसोदिया यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला" ते म्हणाले की, 5 ऑक्टोबर रोजी हरियाणातील जनता राज्यात बदल घडवण्यासाठी ईव्हीएममधील झाडूचे बटण दाबणार आहे. या रोड शोमध्ये जमलेल्या लोकांचा उत्साह मला दिसत आहे आणि हा उत्साहच आपचे हरियाणातील भविष्य सांगणार आहे. येत्या पाच ऑक्टोबरला ईव्हीएममधील झाडूचे बटण दाबून भाजपला सत्तेतून हटवायचे आहे. यावेळी हरियाणात बदल होणार असून आपचे सरकार स्थापन होणार आहे.


'झाडूचे बटन दाबा - मोफत वीज, चांगल्या शाळा आणि रुग्णालये मिळवा'

मनीष सिसोदीया यांनी यावेळी हरियाणातील जनतेला 5 ऑक्टोबरला 'झाडूचे बटन दाबा - मोफत वीज, चांगल्या शाळा आणि रुग्णालये मिळवा' असे आश्वासन दिले आणि आप पक्षाला विजयी करण्याचे आवाहन केले. मनीष सिसोदीया अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत वीज बिल 0 पर्यंत कमी केले. प्रामाणिकपणा आणि कामाच्या राजकारणाचा हा परिणाम आहे असेही ते म्हणाले.

महिलांना दरमहा एक हजार रुपये

मनीष सिसोदीया यांनी म्हटलं की, आमच्या पक्षानेही पंजाबमध्ये जनतेला चोवीस तास मोफत वीज दिली आहे. यावेळी तुम्ही लोक हरियाणात केजरीवाल यांचे सरकार आणा, तुम्हालाही मोफत वीज मिळेल. सरकारी शाळा सर्वोत्तम असतील, जिथे तुमच्या मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण मोफत मिळेल. सरकारी दवाखान्यात मोफत उपचार होतील. महिलांना दरमहा एक हजार रुपये आणि तरुणांना रोजगार मिळेल.

आज आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालही हरियाणामध्ये आहेत. बल्लभगडमध्ये ते विधानसभेत रोड शो करत आहेत. तर तिकडे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी यमुनानगरमध्ये जाहीर सभेला संबोधित केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+