Hartalika Vrat 2025: हरितालिकेनिमित्त पतीसाठी खास शुभेच्छा संदेश, पत्नीसाठी खास शायरी, वाचा शेअर करा
Hartalika Vrat 2025 marathi wishes for husband : हरितालिका... केवळ एक व्रत नाही, तर ते एक निस्सीम प्रेम, त्याग आणि विश्वासाचं रूपक आहे. भाद्रपदाच्या तृतीयेला, जेव्हा निसर्ग हिरवागार शालू पांघरतो, तेव्हा प्रत्येक विवाहित स्त्रीच्या मनातही आपल्या सोबत्यासाठी प्रीतीचा अंकुर फुलतो.
हे व्रत म्हणजे निर्जल वाळवंटात फुलणारे प्रेमपुष्प आहे. ज्याप्रमाणे पार्वतीने शंकरासाठी सर्व सुखांचा त्याग करून कठोर तपश्चर्या केली, त्याचप्रमाणे आजची स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाण्याचा एक थेंबही न घेता व्रत करते. हे व्रत म्हणजे एका बाजूला शारीरिक तपस्या आणि दुसऱ्या बाजूला आत्मिक समर्पण आहे.

शिव आणि पार्वतीचं नातं हे या व्रताचं मूळ आहे. शिव म्हणजे पुरुषतत्त्व आणि पार्वती म्हणजे प्रकृती. या दोघांच्या मिलनातूनच सृष्टीची निर्मिती झाली. हरितालिका म्हणजे या दोन दैवी शक्तींना पुन्हा एकत्र आणण्याचा आणि त्यांच्यासारखं अढळ प्रेम आपल्या आयुष्यात मिळावं यासाठी केलेला एक उत्सव.
हे व्रत म्हणजे केवळ उपवास नाही, तर तो आपल्या पती-पत्नीच्या नात्यात प्रेम, विश्वास आणि गोडव्याची नवी भर घालणारा एक सोहळा आहे. झोक्यावर घेतलेला प्रत्येक हेलकावा म्हणजे जीवनातील चढ-उतारातही एकमेकांना साथ देण्याचं वचन आहे.
म्हणूनच, हरितालिका म्हणजे सौभाग्याचा सोहळा, प्रेमाचा उत्सव आणि आयुष्याच्या प्रत्येक क्षणी एकमेकांच्या पाठीशी उभं राहण्याचं पती पत्नीच्या भावबंधाचा हा सण आहे. हरितालिकेच्या निमित्ताने येथे आम्ही तुमच्यासाठी असेच काही खास आणि प्रेमळ संदेश घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रियजनांना पाठवून हा दिवस अविस्मरणीय बनवू शकता. शुभेच्छा, कोट्स आणि शायरीच्या माध्यमातून पती-पत्नीच्या नात्यात अधिक प्रेम आणि गोडवा वाढवता येतो.
हरितालिका तीजचे पतीसाठी शुभेच्छा संदेश (Hartalika Vrat 2025 marathi wishes for husband)
- 'सजना है मुझे सजना के लिए.., हरितालिका तीजच्या हार्दिक शुभेच्छा.
- 'हे माता पार्वती, आमच्यावर कृपादृष्टी ठेवा', हरितालिका तीजच्या हार्दिक शुभेच्छा.
- 'सोळा शृंगार करून आज आई, तुझ्या दरबारी आले, सौभाग्याचा आशीर्वाद दे', हरितालिका तीजच्या हार्दिक शुभेच्छा.
- 'कडक ऊन असो वा दाट सावली, पती-पत्नीचे नाते प्रत्येक परिस्थितीत मजबूत राहिले पाहिजे.' तीजच्या हार्दिक शुभेच्छा.
- 'हरितालिका तीज हे केवळ एक व्रत नाही, तर जीवनसाथीबद्दलच्या निस्वार्थ प्रेमाचे प्रतीक आहे.' तीजच्या हार्दिक शुभेच्छा.
- 'खरे प्रेम त्याग आणि श्रद्धेने परिपूर्ण असते', तीजच्या हार्दिक शुभेच्छा.
हरितालिका व्रत- पत्नीसाठी शायरी (Hartalika Vrat 2025 marathi shayari for wife)
- तुझ्याशिवाय जीवन अपूर्ण वाटते, तुझ्या हास्याने माझे घर सजते. तीजच्या हार्दिक शुभेच्छा.
- तुझी साथ हीच माझी ओळख आहे, तुझ्या हृदयाची धडकन हीच माझा श्वास आहे. तीजच्या हार्दिक शुभेच्छा.
- तुझ्यासोबतच माझ्या नशिबाचे हास्य आहे, तीजच्या रात्री तूच माझा प्रकाश आहेस. तीजच्या हार्दिक शुभेच्छा.
- 'तुझी साथ आहे तर मला कशाची कमी आहे', हॅपी वाली तीज.
- हरितालिका तीजच्या शुभेच्छा.. हरितालिका तीजच्या या पावन प्रसंगी भगवान शिव आणि माता पार्वती तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देवो.
- तीजचा हा सण तुमच्या आयुष्यात प्रेम आणि विश्वासाचा नवा प्रकाश घेऊन येवो. हरितालिका तीजच्या खूप खूप शुभेच्छा!
- माता पार्वती तुमच्या वैवाहिक जीवनाला आनंदी ठेवो. हरितालिका तीजच्या खूप खूप शुभेच्छा!












Click it and Unblock the Notifications