Hariyana election result 2024 : काँग्रेसच्या विनेश फोगट 9व्या फेरीनंतर 4,130 मतांनी आघाडीवर!
Hariyana election result 2024 : हरियाना विधानसभा निवडणुकीत मोठे उलटफेर होत असून एक्झिट पोलचे अंदाच साफ चुकत असल्याचे दिसून येत आहे. यातच हरियाणातील जुलाना येथील मतमोजणीच्या 9व्या फेरीनंतर काँग्रेसच्या विनेश फोगट 4,130 मतांनी आघाडीवर आहे. ही काँग्रेससाठी समाधानाची बाब आहे.
भाजपचे योगेश बैरागी पिछाडीवर आहेत.
आठव्या फेरीनंतर काँग्रेसच्या विनेश फोगट 2,100 मतांनी आघाडीवर होती. त्यानंतर नववी फेरीची मतमोजणी पुर्ण झाली आहे. यात चार हजार एकशे तीस मतांनी विनेश आघाडीवर आहे. भाजपचे योगेश बैरागी पिछाडीवर आहेत.

विनेश फोगाट ही सुद्धा काँग्रेसमध्येच असल्याने तिचा विजय सोपा आहे हेही सांगण्यात येत आहे. त्यामुशे कुस्तीतून राजकारणात आलेली विनेश आमदार होईल अशी दाट शक्यता आहे.
विनेश जिंकणार का हे मतमोजणी पुर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल. काल मात्र सैनी, हुड्डा, फोगट, चौटाला विनेश फोगट यांच्या विजय-पराजयाचे गणिताचे व्हिडिओ मतमोजणीपूर्वी सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यात विधानसभा लढवणाऱ्या विनेश फोगटच्या बाजूने जास्तच मते पडतील अंदाज बांधला जात होता. हरियाणात पहिल्यांदाच जिंद जिल्ह्यातील जुलाना जागेवर मतदान झाले. मात्र, तिथे विनेश जिंकणार ही चर्चा जरी असली तरीही निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालावरून खरी परिस्थिती कळणार आहे.
सकाळी अकरा वाजेपर्यंत कोण कुठे किती मतांनी आघाडीवर
1. नायब सिंग सैनी, लाडवा जागेचा निकाल-5430 च्या पुढे
2. भूपेंद्र सिंह हुडा, गढ़ी-सांपला-किलोई जागेचा निकाल - 30906 मतांनी पुढे.
3. दुष्यंत चौटाला, उचाना कलान जागेचा निकाल- 11972 मतांनी पिछाडीवर
4. विनेश फोगट, जुलाना जागेचा निकाल- 1417 मतांनी पिछाडीवर
5. अभय सिंह चौटाला, एलेनाबाद जागेचा निकाल - 5778 मतांनी पिछाडीवर
6. अनिल विज, अंबाला कँट जागेचा निकाल- 1232 मतांनी पिछाडीवर
7. गोपाल कांडा, सिरसा मतदारसंघाचा निकाल - 2770 मतांनी पिछाडीवर
8. सावित्री जिंदाल, हिसार मतदारसंघाचा निकाल - 3836 मतांनी पुढे
9. रणजीत चौटाला, रानिया जागेचा निकाल - 5932 मतांनी पिछाडीवर
10. आदित्य सुरजेवाला, कैथल जागेचा निकाल - 4002 मतांनी पुढे
11. भव्य बिश्नोई, आदमपूर जागेचा निकाल - 825 मतांनी पुढे












Click it and Unblock the Notifications