Happy teachers day 2025 : आयुष्यातील पहिल्या शिक्षकांना, आई-वडिलांना खास शुभेच्छा द्या! Top 10 संदेश
Happy teachers day 2025 wishes in marathi : आई आणि वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिले आणि सर्वात महत्त्वाचे शिक्षक असतात. तेच मुलांना योग्य-अयोग्य काय, याचे ज्ञान देतात आणि जीवन जगण्याची शिकवण देतात. शिक्षक दिन हा शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे योगदान सन्मानित करण्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की जीवनातील शिक्षण आणि संस्कारांचा पहिला धडा आई-वडिलांकडूनच मिळतो.

यावर्षी ५ सप्टेंबर, २०२५ रोजी शिक्षक दिन साजरा केला जाईल. हा दिवस केवळ शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांसाठी नाही, तर प्रत्येक पावलावर आपल्याला योग्य मार्ग दाखवणाऱ्या आई-वडिलांनाही समर्पित आहे. या खास प्रसंगी, तुम्ही तुमच्या आई-वडिलांना आणि शिक्षकांना शुभेच्छा संदेश आणि शायरीच्या माध्यमातून तुमचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करू शकता.
आई-वडिल, शिक्षकांसाठी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा (Happy teachers day 2025 wishes in marathi)
१. तुम्ही माझी प्रेरणा आहात, तुम्हीच मला आयुष्यातील प्रत्येक योग्य मार्ग शिकवला. शिक्षक दिनानिमित्त तुम्हाला शतशः प्रणाम, आई!
२. ज्यांनी माझ्यासाठी कठीण मार्ग सोपे केले, माझ्या स्वप्नांना वास्तवात आणले, त्या माझ्या आई-वडिलांना माझा प्रणाम. हॅपी टीचर्स डे २०२५!
३. आई, तू मला संस्कार दिले, प्रत्येक अडचणीत तू माझा आधार बनून उभी राहिलीस. तुझ्याशिवाय माझी ओळख अपूर्ण आहे. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
४. बाबा, तुम्ही मला मेहनतीचा धडा शिकवला, स्वप्न पूर्ण करण्याचे धैर्य दिले. तुम्ही माझे पहिले आणि खरे शिक्षक आहात. हॅपी टीचर्स डे २०२५!
५. तुमच्या आशीर्वादाने आयुष्यात ज्ञान मिळाले, तुमच्या मार्गदर्शनाने प्रत्येक काम शक्य झाले. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, बाबा!
६. तुमच्याकडूनच संघर्ष करायला शिकलो, तुमच्याकडूनच ध्येय गाठायला शिकलो. बाबा, तुम्हीच माझ्या आयुष्यातील खरे शिक्षक आहात. हॅपी टीचर्स डे!
आई-वडिलांसाठी खास संदेश
७. आई-बाबा, तुम्हीच माझे गुरू, तुम्हीच माझे पहिले शिक्षक. तुमच्याशिवाय माझा कोणताही विजय अपूर्ण आहे. शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
८. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत हेच आपले असतात. त्यांच्याशिवाय जीवन अपूर्ण आहे, त्यांचा आशीर्वादच सर्वात मोठा आधार आहे. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
९. वडिलांच्या कणखर हातांचा आधार, आईच्या शब्दांमध्ये आहे सुखाचा सागर. हेच तर आहेत आयुष्याचे अनमोल आधार. हॅपी टीचर्स डे!
१०. आज मी जिथे आहे ते फक्त माझे आई-वडील आणि शिक्षकामुळेच.. म्हणून या तिघांना माझा सांष्टांग दंडवत, हॅपी टीचर्स डे!












Click it and Unblock the Notifications