कॉफी म्हणजे प्रेम पण चहा म्हणजे आयुष्य..चहा दिनानिमित्त द्या शुभेच्छा टाॅप 10 कोट्स खास तुमच्यासाठी.
Happy Tea Day 2025 Wishes in Marathi : चहा हा भारतातील सर्वात लोकप्रिय पेय..भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या 80 कोटींच्या घरात असू शकते. एवढी लोकप्रियता चहाला आहे. नित्य उठल्यानंतर चहा पिणे हे आद्यकर्तव्यच मानले जाते. चहा काय काम करत नाही. चहामुळे चर्चा घडते, ओळखी होतात अन् नवीन व्यक्तीही भेटतात, त्यातून ऋणानुबंध निर्माण होतात. इतकेच काय तर चहामुळे मैत्री अन् कामफत्तेही होते..हे अनेक उदाहरणावरुन आणि प्रचलित घडामोडीवरुन दिसून येते.

आता एवढी चहाची महती जर सांगितली असेल तर चहासाठी खास दिवसही असेल हे तर कुणाला सांगायला नको. सर्व चहा प्रेमींसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक ठाराविक दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनुसार दरवर्षी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो. 21 डिसेंबर 2019 रोजी यासंबंधीचा ठराव स्वीकारण्यात आला आणि संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) या दिवसाचे पालन करण्याचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले.

2005 पासून भारत, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनेशिया, बांगलादेश, केनिया, मलावी, मलेशिया, युगांडा आणि टांझानिया यासारख्या चहा उत्पादक देशांमध्ये १५ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो. आता चहा दिन जर असेल तर मग चहाबद्दलची महती आणि कोट्सही तुमच्यासाठी महत्वाचेच आहेत आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करण्यासाठी येथे काही कोट्स आणि शुभेच्छा आहेत. जे तुम्ही शेअर करुन तुमचे नाते अधिक दृढ तुम्ही बनवू शकाल.
आंतरराष्ट्रीय चहा दिनानिमित्त शुभेच्छा संदेश अन् कोट्स (Happy Tea Day 2025 Wishes in Marathi)
1. चहा असताना कोणाला पुरूषाची गरज आहे? आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा!!
2. आज आंतरराष्ट्रीय चहा दिन... एक चहा तुमच्यासाठी जो तुम्हाला सक्षम आणि ऊर्जावान बनवेल.चहा दिनाच्या शुभेच्छा!!
3. एक कप चहा म्हणजे शांतीचा प्याला. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा!!
4. "चहा म्हणजे तुमचा मेंदू जिथे ठेवला जातो त्या तिजोरीची जादूची किल्ली आहे."
5. "जर तुम्ही थंड असाल, तर चहा तुम्हाला उबदार करेल; जर तुम्ही खूप गरम असाल, तर तो तुम्हाला थंड करेल; जर तुम्ही निराश असाल, तर तो तुम्हाला आनंद देईल; जर तुम्ही उत्साहित असाल, तर तो तुम्हाला शांत करेल."
6. कॉफी म्हणजे प्रेम पण चहा म्हणजे आयुष्य.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा..!
7. कॉफीवर फक्त थोडेसे संस्कार केले जातात, पण चहावर नाती बांधली जातात.. आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या शुभेच्छा..!
8. गरम चाय की प्याली हो.. साथ मे घरवाली हो... आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
9. कधीही विचारु नका मला काॅफी कारण मी आधीच चहाच्या प्रेमात आहे..चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
10. योग्य साखर आणि चहा पुडमुळे चहा उत्तम बनतो अगदी तसंच योग्य संगत अशली की, मनही जुळतात.












Click it and Unblock the Notifications