Happy Rang panchami Marathi Wishes : रंगपंचमीच्या तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा संदेश
Happy Rang panchami Marathi Wishes : होळीच्या पाचव्या दिवशी साजरा होणारा हा सण रंग आणि आनंदाचे प्रतीक आहे. याला देव होळी असेही म्हणतात, कारण असे मानले जाते की या दिवशी रंग खेळल्याने देवता प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. या वर्षी रंगपंचमी 19 मार्च रोजी साजरी केली जाईल.
होळीप्रमाणेच या दिवशीही खूप थाटामाट आणि दिमाख असतो; लोक एकमेकांवर रंग लावून आणि गुलाल उधळून उत्सव साजरा करतात. तुम्ही तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा देऊन हा सण अधिक खास बनवू शकता. तुमचे जीवन रंगांच्या गोडव्याने आणि आनंदाने भरलेले असो!

रंगात रंगून जाऊ
सुखात चिंब न्हाऊ
जीवनात राहू दे रंग
सौख्याचे अक्षय तरंग
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या आयुष्यात आनंदाचे,
प्रेमाचे आणि रंगीबेरंगी क्षणांचे रंग भरू दे.
सुख, समृद्धी आणि चांगल्या
आठवणींचे रंग तुमच्या आयुष्याला
अधिक सुंदर करू दे.
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
पाणी वाचवा
नैसर्गिक रंग वापरा
कोणालाही दुखापत न होऊ देता
चला खेळू या रंग
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
आपल्या आयुष्यात वेगवेगळे रंग बहरो
सुखाच्या रंगानी आयुष्य रंगबिरंगी होवो!
रंग पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
एक रंग मैत्रीचा
एक रंग आनंदाचा
सण आला उत्सवाचा
साजरा करुया चला सण रंगाचा
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
सप्तरंगांची उधळण
आपुलकीचा ओलावा
अखंड राहो नात्यांचा गोडवा
रंगपंचमी निमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
रंग न जाणती जात न भाषा
चला उडवू रंग
वाढू दे प्रेमाची नशा
साजरी करु रंगपंचमी.. ही मनी आशा..
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!












Click it and Unblock the Notifications