Happy Paryushan Parva : पर्यूषण पर्वानिमित्त शुभेच्छा संदेश, व्हाॅट्सअॅप स्टेट्स, वाचा अन् शेअर करा
Happy Paryushan Parva 2025 wishes in marathi : जेव्हा निसर्ग शांत होतो आणि मानवी मन अंतर्मुख होते... तो काळ म्हणजे पर्युषण... हा असा एक उत्सव जो केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नाही, तर आत्म्याच्या जवळ जाण्याचा एक अनोखा प्रवास आहे. रोजच्या धावपळीतून तुम्ही थोडा वेळ काढून मनातील अनावश्यक गोष्टी बाहेर काढण्यासाठी या माध्यमातून प्रार्थना करता येते. तुमच्या आतल्या शांततेशी संवाद साधण्यासाठी. 'पर्युषण' शब्दाचा खरा अर्थ उलगडतो.

पयूर्षन पर्व हे 18 दिवसांचे असते. या अठरा दिवसांच्या प्रवासात दोन वेगवेगळे मार्ग आहेत. श्वेतांबर जैन बांधव 8 दिवसांचा तर दिगंबर जैन धर्मीयांचा 10 दिवसांचा पयुर्षण काळ असतो. या दोन्ही मार्गांचे अंतिम ध्येय एकच आहे ते म्हणजे आत्मशुद्धी. या काळात, उपवास आणि तपश्चर्या केवळ शरीराला नव्हे, तर मनालाही अधिक बळकट बनवते.
या प्रवासातील सर्वात सुंदर क्षण असतो, जेव्हा आपण आपल्या मनातील नकारात्मकता आणि द्वेषाची गाठ सोडतो. पर्युषण आपल्याला 'क्षमा' आणि 'आत्मसंयम'. या दिवसांत आपण आपल्या चुकांची प्रांजळपणे कबुली देतो आणि दुसऱ्यांनाही मनापासून माफ करतो. ही क्षमा आपल्याला हलकेपणाची आणि मोकळेपणाची भावना देते.
पर्युषण आपल्याला आठवण करून देते की, जीवन म्हणजे केवळ भौतिक सुखांमागे धावणे नाही. त्याऐवजी, ते सत्य, अहिंसा आणि करुणा या मूल्यांवर आधारित आहे. हा उत्सव आपल्याला आपल्या आतल्या शांततेच्या शोधात मदत करतो आणि जीवनाचा खरा अर्थ काय आहे, याची जाणीव करून देतो. चला, या पर्युषण पर्वाच्या शुभ मुहूर्तावर आपण सगळे मिळून आपल्या जीवनात शुद्धता, शांती आणि अहिंसेचा एक नवीन अध्याय सुरू करूया. खास शुभेच्छा संदेश आपल्यासाठी देत आहोत, ज्या तुम्ही तुमच्या दुरावलेल्या लोकांना पाठवून त्यांच्या जवळ जाऊ शकाल.
पर्युषण पर्व 2025: शुभेच्छा आणि संदेश (Paryushan Festival 2025: Wishes and Messages)
- संसार खूप लहान आहे, पण प्रत्येक पावलावर अनेक चुका होतात. जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकांमुळे तुम्हाला कधीही दु:ख झाले असेल, तर मी नम्रपणे क्षमा मागतो. मिच्छामि दुक्कडं!
- फुलं कधीच दोनदा उमलत नाहीत, जन्म कधीच दोनदा मिळत नाही. असे जन्म हजारो मिळतात, पण जैन धर्म वारंवार मिळत नाही. पर्युषण पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!
- नवकार माझा श्वास आहे, जैन धर्म माझा विश्वास आहे, गुरुदेव माझे प्राण आहेत, आणि मला मोक्षाची आस आहे. शुभ पर्युषण पर्व!
- पर्युषण हे संयम, क्षमा करुणेचे पर्व आहे. इतर सण उपभोग घेण्याचे असतात, पण हा त्यागाचा सण आहे. मन, वचन आणि शरीराने त्याग करण्याचा हा सण आहे. चला, आपण सर्व मिळून हा सण साजरा करूया. पर्युषण पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!
- पर्यूषण पर्व आपल्या मनाची शुद्धता, अहिंसेच्या मार्गावर चालणे, राग-द्वेष मिटवणे आणि धर्माच्या मार्गावर चालणे शिकवतो. जय जिनेंद्र! पर्युषण पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!
- पर्युषणचे आगमन झाले आहे, धर्म ध्यानाचा काळ आहे. धर्म करा, कर्म तोडा, हाच संदेश जगाला द्या, "जगा आणि जगू द्या". अहिंसा परमो धर्म. जय जिनेंद्र!
- पर्युषण असा महाउत्सव आहे जो आत्म्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवतो, रागावर विराग मिळवतो आणि अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो.
- पैशाच्या हव्यासाने आजच्या माणसाला आंधळे केले आहे. हे पर्व माणसाला शिकवते की जीवनात पैसा 'काहीतरी' असू शकतो, 'खूप काही' असू शकतो, पण तो 'सर्वस्व' नाही.
- जीवनाचे खरे सौंदर्य बाहेरील संपत्तीमध्ये नाही, तर आतील शांतीमध्ये आहे. नात्यांचे खरे सौंदर्य राग आणि वाद मिटवून क्षमा मागण्यात आहे. आणि आत्म्याची खरी शक्ती संयम, तप आणि करुणेमध्ये आहे.












Click it and Unblock the Notifications