Happy holi 2025 Shayari: होळीच्या दिवशी तुमच्या मित्रांना 'या' मजेदार कविता, शेरो-शायरी जोक्स पाठवा

Happy holi 2025 Shayari Funny Wishes and jokes : मजेदार होळीच्या शुभेच्छा, कोट्स आणि जोक्स : सारे भारतवर्ष होळी या सणाची आतुरतेने वाट पाहत आहे. या सणाला एकमेंकांतील प्रेम व्यक्त करण्याचा भावबंध जपण्याचा आणि रुसवा-फुगवा सोडण्याचा दिवस...जरी तुमचे कुणाशी बिनसलेले असले तरीही या दिवशी त्यांच्याशी बोला, त्यांना संदेश, शुभेच्छा आणि शायरी पाठवा कारण स्नेह हा कायम टिकतो तर रुसवे फुगवे क्षणिक असतात.

यावर्षी 14 मार्चला होळी साजरी केली जाईल. या दिवशी लोक रंग खेळतात, आपापसातील नाराजी विसरून एकमेकांना मिठी मारतात आणि नाचणे आणि गाण्यात खूप मजा करतात. होळीची मजा वाढवण्यासाठी हसणे देखील महत्त्वाचे आहे, कारण हसणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Happy holi 2025 Shayari

एक मजेशीर 'जोक्सचा डोस' वातावरण आणखीनच आल्हाददायक बनवतो. म्हणूनच, आम्ही तुमच्यासाठी होळीचे खास जोक्स घेऊन आलो आहोत, जे वाचून तुम्ही हसून हसाल. या, होळीच्या या मजेदार विनोदांचा आनंद घ्या आणि सण आणखी खास बनवा! होळीवर मित्रांसाठी शायरी आणि जोक्स वाचा. (Happy holi 2025 Shayari)

होळीसाठी मजेदार कविता, शेरो-शायरी जोक्स

1. खेळताना रंग बाई होळीचा फाटला ग कोना माझ्या चोळीचा...

2. होळीच्या रंगात रंगून जाईल
बेधुंद होईल, तुला कवेत घेईल
सारे जग पाहत राहील तुला-मला

3. रंगात रंग आहे माझा वेगळा
तु आहेस सोबत मग
आनंद आहे सगळा

4. होळीचा रंग, मन झाले दंग
तुझ्याचसाठी माझे जीवन आनंदतरंग

5. प्रेमाची होळी तुला लावेल लाडी-गोडी
आणेल तुझ्यासाठी जरीची लाल साडी

6. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो
तुझ्या हृदयाची तार होळीच्या दिनी छेडतो

होळीसाठी फनी जोक्स

1. ज्यांनी संपूर्ण हिवाळ्यात आंघोळ केली नाही त्यांच्या आंघोळीची होतेय तयारी, जर घराबाहेर आले नाही तर मारु रंगाची पिचकारी- हॅप्पी होली

2. एक व्यक्ती होती, तिला गाण्याची खूप आवड होती, पण तिचा आवाज खूप खराब होता, होळीच्या दिवशी ती भांग पिऊन आवाजात महेबुबा महेबुबा गाणे म्हणू लागला पण गाणं गाताना बिचारा नशेत होळी खेळण्यापूर्वीच नाल्यात पडला. मग नाल्यातून आवाज आला,अरे कुणी तरी मला मदत करा मै डुबा- मै डुबा...होळीच्या शुभेच्छा

3. आज होळी आहे, मी दारू सोडण्याचा विचार करतोय, पण आज दारू सोडण्याचा विचार आहे का???? जाऊ दे सर्व मित्र गद्दार आहेत, माझ्या आधीच पिऊन बसतील.- होळीच्या शुभेच्छा

4. प्रेयसी - मी माझी पर्स घरी विसरले, मला 1000 रुपये हवे आहेत.

प्रियकर: बस्स एवढीची गोष्ट..हे घे 10 रुपये आणि आता रिक्षातून घरी जा आणि पर्स घेऊन ये. प्रेयसी बेशुद्ध- होळीच्या शुभेच्छा

5. नवरा - प्रिये, तू दररोज अधिक सुंदर होत आहेस

बायको किचनमधून - तुला कसे कळले

नवरा - तुला पाहून आता भाकरीही जळू लागल्या आहेत - होळीच्या शुभेच्छा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+