Friendship Day 2024 : फ्रेंडशिप डे' निमित्त मित्रांना पाठवा "हा" संदेश, तुमचं नातं होईल आणखीच घट्ट
Friendship Day 2024 Wishes: व्यक्तीला जन्मताच अनेक नाते मिळतात पण एक नातं असं आहे जे व्यक्ती त्याच्या कर्तुत्वाने निर्माण करतो. हे नातं म्हणजे 'मैत्री' आहे. व्यक्तीच्या जीवनात मैत्रीचे नाते खूप महत्त्वाचे आणि अनमोल असते. भारतामध्ये ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. तर इतर देशांमध्ये 30 जुलै रोजी फ्रेंडशिप साजरा केला जातो.
दिवस कोणताही असो मात्र मैत्रीचे नाते घट्ट करण्यासाठी आणि मित्र-मैत्रिणीविषयी असलेली प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. मित्र मैत्रिणी एकत्र येऊन हा दिवस आनंदाने साजरा देखील करतात. यावर्षी म्हणजेच 2024 मध्ये हा दिवस उद्या 4 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आयुष्यात अनेक मित्र मैत्रिणी असतात. त्यातील काही मित्र मैत्रिणी हे आपल्या हृदयाच्या सगळ्यात जवळ असतात. आपल्या सुख दुःखात इतर आनंदाच्या क्षणी आपल्यासोबत कायम असतात.त्या पार्श्वभूमीवर आपापल्या मित्र-मैत्रिणींसोबत फ्रेंडशिप डे साजरा करण्याचे प्लॅनिंग देखील केले जात आहे
मित्रासाठी स्पेशल फ्रेंडशिप डे निमित्त संदेश :
जर तुमचा मित्र तुमच्यासोबत नसेल तर आणि दूर असेल तर त्याला सुंदर संदेश पाठवून तुमच्या भावनांची जाणीव करून द्या,हा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रासाठी नक्कीच अविस्मरणीय बनेल:
- पंखांशिवाय उडण्याचे स्वप्न मैत्रीचं जगही छान असतं. फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा !
- आमच्या मैत्रीचे एकच तत्व आहे, जेव्हा तुम्हाला स्वीकारले जाते, तेव्हा तुमच्याबद्दल सर्व काही स्वीकारले जाते. मैत्री दिनाच्या शुभेच्छा !
- वारा बेधुंद, दुनियादारीचा गंध, फुलांचा सुगंध आणि आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध... हॅपी फ्रेंडशिप डे!
- कुठलंही नातं नसताना आयुष्यभर साथ देते ती मैत्री !
- तू सोबत असल्यावर माझ्यासाठी रोजच 'फ्रेंडशिप डे'असतो !
- कोण म्हणतं मैत्री बरबाद करते, जर निभावणारे कट्टर असतील ना तर सारी दुनिया सलाम करते !
- एक भास जो कधीही दुखावत नाही आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही !
- मात्र आज तू माझ्यापासून दूर असल्यामुळे तुला 'फ्रेंडशिप डे' या दिवसाच्या तुला च्या लाख लाख शुभेच्छा !
- मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय जे कधी तिरस्कार करत नाही, एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही !
- मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात - अब्राहम लिंकन
- जो टीका करतो मात्र मैत्री तुटेल याच्या भितीने सावध राहतो तो तुमचा मित्र नाही - गौतम बुद्ध
- मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे.
- ते जीवन कोणते आहे ज्यात एकटेपणा आहे? तो मित्र कोणता आहे जो तुम्हाला आठवत नाही?
- फ्रेंडशिप डे २०२४ च्या शुभेच्छा .
अशा प्रकारे आपल्या जवळच्या मित्रांना प्रत्येकाने संदेश पाठवावा आणि आपल्या मित्राचं मन जिंकावं. दूर असलेल्या मित्राला हा संदेश नक्कीच आवडल्याशिवाय राहणार नाही.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
DA Hike सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 5% वाढ; पगार वाढणार 'या' राज्याचा मोठा निर्णय -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Gudi padwa 2026 wishes in Marathi : गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाचे खास 30 शुभेच्छा संदेश शेअर करा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा











Click it and Unblock the Notifications