Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Happy Children's Day 2024: बालपण देगा देवा ! बालदिनानिमित्त खास शुभेच्छा संदेश पाठवा

Happy Children's Day 2024: बालदिन दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. जो भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे. पं नेहरू मुलांबद्दलच्या त्यांच्या विशेष प्रेमासाठी प्रसिद्ध होते. पं नेहरू यांनी मुलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक पुढाकार घेतले.

बालदिन मुलांचे महत्त्व समजून घेण्याची आणि त्यांना शिक्षण, खेळ आणि उत्तम आरोग्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित करतो. चित्रकला स्पर्धा, नृत्य, गाणी आणि खेळ यासारख्या शाळा आणि समाजात विविध उपक्रमांचे आयोजन करून हा दिवस मुलांसाठी एक सणाचा उत्सव असतो.

Happy Children s Day 2024

मुलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, जसे की शिक्षणाचा अधिकार आणि सुरक्षित वातावरणात जगण्याचा अधिकार याविषयी देखील या दिवसाचा उद्देश आहे. या खास प्रसंगी येथे काही खास शुभेच्छा संदेश आम्ही सांगणार आहेत.

- थोडं टेंशनला ब्रेक देऊया, रोजचं काम थोडं दूर ठेवूया, तर्कबुद्धीला आराम देऊया, आज थोडं लहान होऊया, बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

- मुलंही देवाघरची फुलं ते आनंद पसरवतात आणि सुख देतात. त्यांच्यावर भरपूर प्रेम करा.नाजूक हातांनी सांभाळा . बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

- मनात बालपण जपणाऱ्या प्रत्येकाला बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा !

- जगात अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपण विकत घेऊ शकत नाही. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे आपले बालपण. बालपणीचे दिवस लक्षात ठेवा आणि एन्जॉय करा. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

- रडण्याचे कारण नाही आणि हसायला निमित्त नाही. बालपण असे आहे की, ते प्रत्येक मुलाने मुक्तपणे घालवावे. तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

- बालपणी होते स्वछंद खेळाचे क्षण, बालपणीच्या आठवणीत हरवते मन, कधीच येणार नाहीत ते निरागस क्षण, बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

- जगातील सर्वात खरी वेळ, जगातील सर्वोत्तम दिवस. जगातील सर्वात सुंदर क्षण फक्त बालपणात सापडते.तुम्हा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

- हा दिवस तुमच्या छोट्या मित्रांसोबत घालवा. त्यांच्या जीवनात आनंद आणण्याचे वचन द्या. बालदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

- मुलं म्हणजे पाखरांची चपळता, मुलं म्हणजे पाटेची सौम्य उज्ज्वलता, मुलं म्हणजे झऱ्याचा खळखळाट, मुलं म्हणजे आनंद उत्साहाचा स्त्रोत, बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+