'राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की..' हनुमान जयंतीनिमित्त खास शुभेच्छा संदेश नातेवाईकांना शेअर करा
Hanuman Jayanti 2025 wishes quotes messages : हनुमान जयंती, हिंदू धर्माचा एक महत्त्वाचा सण, 2025 यावर्षी 12 एप्रिल रोजी आहे. भल्या पहाटेच हनुमान जयंती साजरी होते. हा सण चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाला हनुमानाची जयंती, मारुती जन्म, हनुमान जन्म अशा विविध नावाने ओळखले जाते.
भारत देश विविधतेने नटलेला आहे तशीच विविधता हनुमानाच्या नावातही आहे, राम भक्त हनुमान, पवनसुत हनुमान, अंजनीसूत, बजरंगबली अशा अनेक नावानी हनुमानाला संबोधले जाते. हनुमान शिवाचा 11वा रुद्र अवतार होता आणि श्री रामाचा सर्वात मोठा भक्त मानला जात असे. त्याला महाबली हेही नावांनी संबोधले जाते. या हनुमान जयंतीच्या, तुमच्या नातेवाईकांना आणि परिचितांना 'या' संदेशांद्वारे शुभेच्छा द्या.

हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!.. खास 15 शुभेच्छा संदेश (Hanuman Jayanti 2025)
1. ज्यांच्या मनात राम आहे
ज्यांच्या तनात राम आहे
संपूर्ण विश्वात जो बलवान आहे
त्या बजरंगबलीला शतःश प्रणाम
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
2. सुर्याचा घ्यायला गेला घास
जो वीरांचा आहे खास
त्याच्या शक्तीपुढे सर्व काही लहान
असा रामभक्त आहे सर्व भक्तांमध्ये महान" हनुमान जयंतीच्या शुभेच्छा !
3 रामभक्त हनुमान, अंजनीसूत
पवनपुत्र हनुमान यांची आज जयंती
आपण सर्वांनी मिळून हनुमानाच्या नामाचा जप करूया.
सर्वांना मारुती जयंतीच्या शुभेच्छा!!
4. हे अंजनीच्या पुत्रा, आमची विनंती ऐक, आमच्या तीव्र दु:खाचे जाळे कापून टाक.
तू मारुती-नंदन, दु:खाचा नाश करणारा आहेस.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
5. जो कोणी हनुमानाचे नामस्मरण करतो त्याचे सर्व दिवस उजळतात, हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा! संकटमोचन हनुमानजीचा आपल्यावर सदैव आशीर्वाद राहो..जय श्री हनुमान जय श्री राम,
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

6. बजरंगबली सर्वांचे दु:ख दूर करतो, सुख देतो, सर्व भक्तांचे कल्याण करतो, तो प्रत्येक क्षणी राम-रामाचा जप करतो, तू सर्व विश्वाचा स्वामी आहेस. जय बजरंगबली !
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
7.हे दुःख भन्जन, मारुती नंदन,
सुन लो मेरी पुकार ।
पवनसुत विनती बारम्बार
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
8. हे..अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एकमुखानं बोला..बोला जय-जय हनुमान
मारोती जन्माच्या शुभेच्छा!
9. हे हनुमंता दिव्य तुझी रामभक्ती,
भव्य तुझी काया..बालपणी गेलासी तु सुर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान
....एक मुखाने बोला, जय-जय हनुमान!
10. राम भक्त तू पवन पुत्र तू
दानवांची करतो दाणादाण
तुझ्या हृदयात फक्त सीताराम
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
11. महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथ पूर्ण तारावयासी असा चैत्री पौर्णिमेचा जन्म झाला नमस्कार माझा तया मारुतीला हनुमान जयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
12. भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती। वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना।।
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
13. रामाप्रती भक्ती, तुझी राखे अंतरी,
रामासाठी शक्ती,
तुझी राम राम बोले वैखरी...
हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा!
14. राम लक्ष्मण जानकी
जय बोला हनुमान की!
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
15. पवनपुत्र, अजंनीसूत,
प्रभू श्री रामचंद्राचा परमभक्त
मारूती रायाचा विजय असो
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!
टीप: (ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या विश्वास आणि माहितीवर आधारित आहे. oneindia marathi लेखाशी संबंधित कोणतेही इनपुट किंवा माहिती सत्यापित करत नाही. कोणतीही माहिती आणि संकल्पना कृती करण्यापूर्वी किंवा अंमलात आणण्यापूर्वी कृपया तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)












Click it and Unblock the Notifications