Hanuman Jayanti 2025 : हनुमान जयंतीनिमित्त टाॅप भजन आणि गीतं खास भक्तांसाठी...
Hanuman Jayanti 2025 top bhajan songs in marathi and hindi : सर्वांचे आराध्य दैवत आणि प्रभु श्रीरामाचे निस्सीम भक्त आणि भक्ती कशी असावी हे ज्या देवाने शिकवले ते हनुमंत अर्थात हनुमानजींची जयंती चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला येते.
यंदा हनुमान जयंती 12 एप्रिल 2025 रोजी साजरी होणार आहे. हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहात आणि उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त मराठी आणि हिंदीतील टाॅप भजन आणि गीतं आम्ही खास आपल्यासाठी देत आहोत.

मराठीतील भजन आणि गीत (Hanuman Jayanti 2025 top bhajan songs)
1.शरण शरण जी हनुमंता
शरण शरण जी हनुमंता ।
तुज आलों रामदूता ॥१॥
काय भक्तीच्या त्या वाटा ।
मज दावाव्या सुभटा ॥ध्रु.॥
शूर आणि धीर ।
स्वामिकाजीं तूं सादर ॥२॥
तुका म्हणे रुद्रा ।
अंजनीचिया कुमरा ॥३॥

2. भजन - हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
हे..अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, धरधरले आसमान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेउनी पंचप्राण
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
आले किती, गेले किती, संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी, आम्ही झालो रे हैराण
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान
धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा?
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान

हनुमंतांची हिंदी भजन, गीतं (Hanuman Jayanti 2025 top bhajan songs)
3.भजन- हे दुख भन्जन, मारुती नंदन
हे दुख भन्जन, मारुती नंदन,
सुन लो मेरी पुकार।
पवनसुत विनती बारम्बार|
अष्ट सिद्धि, नव निद्दी के दाता,
दुखिओं के तुम भाग्यविदाता ।
सियाराम के काज सवारे,
मेरा करो उधार॥
पवनसुत विनती बारम्बार।
हे दुःख भंजन, मारुती नंदन,
सुन लो मेरी पुकार।
पवनसुत विनती बारम्बार|
अपरम्पार है शक्ति तुम्हारी,
तुम पर रीझे अवधबिहारी ।
भक्ति भाव से ध्याऊं तुम्हे,
कर दुखों से पार॥
पवनसुत विनती बारम्बार।
हे दुःख भंजन, मारुती नंदन,
सुन लो मेरी पुकार।
पवनसुत विनती बारम्बार|
जपूं निरंतर नाम तिहरा,
अब नहीं छोडूं तेरा द्वारा।
राम भक्त मोहे शरण मे लीजे,
भाव सागर से तार॥
पवनसुत विनती बारम्बार।
हे दुःख भंजन, मारुती नंदन,
सुन लो मेरी पुकार।
पवनसुत विनती बारम्बार॥

4. भजन - मंगल मूरति, मारुति नंदन सकल अमंगल मूल निकंदन
मंगल मूरति, मारुति नंदन
सकल अमंगल मूल निकंदन
पवन तनय, संतन हितकारी
हृदय विराजत अवध बिहारी
मंगल मूरति, मारुति नंदन
मात पिता, गुरु, गणपति, सारद
शिवा समेत शंभु, शुक, नारद
मंगल मूरति, मारुति नंदन
चरण कमल बंदौ सब काहू
देहु राम पद नेह निबाहू
मंगल मूरति, मारुति नंदन
बंदौ राम, लखन, बैदेही
जो तुलसी के परम सनेही
मंगल मूरति, मारुति नंदन
जय जय जय हनुमान गोसाई
कृपा करहु, गुरुदेव की नाई
मंगल मूरति, मारुति नंदन
साधु संत के तुम रखवारे
असुर निकंदन, राम दुलारे
मंगल मूरति, मारुति नंदन
मंगल मूरति, मारुति नंदन
सकल अमंगल मूल निकंदन
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम







Click it and Unblock the Notifications