Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

kawad yatra 2024 : विजेचा धक्का लागून कवाड घेऊन जाणा-या 9 भाविकांचा मृत्यू

kawad yatra 2024 : संपूर्ण देशभरात कवाड यात्रेचा उत्साह आहे . ठिकठिकाणी शिवभक्त मिरवूणक काढून जल्लोष साजरा करीत आहेत. अशातच बिहारमधील हाजीपूर येथे झालेल्या एका दुःखद घटना घडली आहे. कवाड घेऊन जाणा-या 9 भाविकांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

कवाड यात्रेकरुची डीजे ट्रॉली विजेच्या तारेला धडकली. या अपघातात अनेकजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कवाड यात्रेकरु हे सोमवारी बाबा हरिहरनाथ मंदिरात जलाभिषेक करणार होते.

bihar

पीडित हाजीपूरच्या औद्योगिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुलतानपूर गावातील रहिवासी आहेत. वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर-जंडाहा रस्त्यावरील नाप्पर गेटजवळ चौहरमाळ ठिकाणी डीजे घेऊन जाणारी ट्रॉली हाय टेंशन वायरला धडकल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना हाजीपूर सदररुग्णालयात दाखल केले.

अपघात कसा झाला?

हाजीपूरच्या पहेलजा घाटावर पाणी गोळा करण्यासाठी कवाडी यात्रेकरु यांनी आधी गर्दी केली होती. पाणी घेऊन ते बाबा हरिहरनाथ मंदिरात जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. बाबाकडे जात असताना वैशाली जिल्ह्यातील हाजीपूर-जंदाहा रस्त्यावरील नाप्पर गेटजवळ डीजे ट्रॉली हाय टेंशन वायरवर आदळली, त्यात विजेचा धक्का लागून कवाडी यांचा मृत्यू झाला.

1 ऑगस्ट रोजी 5 कवाडी भाविकांचा मृत्यू झाला

1 ऑगस्ट रोजी झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात झालेल्या एका दुःखद घटनेत पाच कवाडी यात्रेकरुचा आपला जीव गमवावा लागला होता आणि तीन जण जखमी झाले होते. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बाळुमठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तम तम टोलाजवळ हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हा गट देवघर येथील बाबा वैद्यनाथ मंदिरातून परतत असताना त्यांचे वाहन एका खांबाला धडकले आणि हाय-टेन्शन ओव्हरहेड वायरला धडकले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+