Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

गुरुग्राम हादरले! लिव्ह-इन पार्टनरकडून 3 दिवस अमानुष छळ; प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझर ओतून पेटवले

Gurugram live-in relationship case : आधुनिक युगात डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून जुळणारी नाती किती भयावह वळण घेऊ शकतात, याचा प्रत्यय गुरुग्राममधील एका घटनेने आला आहे.

त्रिपुरा येथील एका 19 वर्षीय विद्यार्थिनीला तिच्याच लिव्ह-इन पार्टनरने तीन दिवस ओलीस ठेवून तिचा नरकयातना देणारा छळ केला. सध्या ही तरुणी दिल्लीतील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. यासंदर्भात तिच्या आईने मोठी वाचा फोडली आहे. नेमकं काय घडलं, त्या नराधम पार्टनरने कसा अत्याचार केला याविषयी सर्व जाणून घेऊया.

Gurugram live-in relationship case

मैत्री, प्रेम आणि नंतर क्रूरतेचा कळस

पीडित तरुणी त्रिपुराची रहिवासी असून ती गुरुग्राममध्ये बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत होती. सप्टेंबर 2024 मध्ये 'डेटिंग ॲप'च्या माध्यमातून तिची ओळख दिल्लीच्या नरेला येथील शिवम नावाच्या तरुणाशी झाली.

ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. सुरुवातीला लग्नाची स्वप्ने दाखवणाऱ्या शिवमच्या मनात नंतर संशयाचे भूत शिरले आणि नात्याचे रूपांतर एका भयानक गुन्ह्यात झाले.

छळ ऐकून अंगावर येईल काटा!

16 फेब्रुवारी 2026 रोजी किरकोळ वादातून शिवमने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या. पीडितेच्या फिर्यादीनुसार, शिवमने स्टीलची बाटली आणि मातीच्या भांड्याने तिच्या डोक्यावर वार केले. तिच्या गुप्तांगांवर सॅनिटायझर ओतून तिला आग लावली. हा प्रकार त्याने तीन दिवसांत अनेकदा केला.

"तू कधीही चालू शकणार नाहीस किंवा आई होऊ शकणार नाहीस," अशी धमकी देत तिच्या पायांवर वार केले. तिला नग्न अवस्थेत खोलीत बंद केले, तिच्यावर लघवी केली आणि तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केले. तिला अन्न-पाण्यापासूनही वंचित ठेवण्यात आले.

आईचा फोन आणि सुटका

१८ फेब्रुवारी रोजी पीडितेने संधी मिळताच शिवमचा फोन वापरून आपल्या आईला कॉल केला. तिची आई स्वतः पोलीस दलात कार्यरत आहे.

"आई, मला वाचवा, नाहीतर तो मला मारून टाकेल," हा तिचा शेवटचा टाहो ऐकून आईने तातडीने ११२ हेल्पलाईनवर संपर्क साधला. गुरुग्राम पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुलीची सुटका केली आणि आरोपी शिवमला अटक केली.

कायदेशीर कारवाई आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह

शिवमवर बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, गंभीर दुखापत करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे यांसारख्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, पीडितेच्या वकिलांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांनी लावलेली कलमे 'सौम्य' असून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप वकील रीना राय यांनी केला आहे.

अशा घटना का वाढत आहेत?

या घटनेच्या निमित्ताने काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत:

डेटिंग ॲप्सचा धोका: अनोळखी व्यक्तीची पूर्ण पार्श्वभूमी माहिती असल्याशिवाय लिव्ह-इनसारखा मोठा निर्णय घेऊ नका. संशयास्पद वर्तन दिसल्यास तातडीने बाहेर पडा.

हिंसाचाराचा कल : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) नुसार, लिव्ह-इनमधील हिंसाचारात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कायदेशीर कवच : घरगुती हिंसाचार कायदा २००५ अंतर्गत महिलांना संरक्षण उपलब्ध आहे. संकटाच्या वेळी १०९१ (महिला हेल्पलाईन) किंवा ११२ चा वापर करा.

संवादाचे महत्त्व : आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय कुटुंबाला नक्की सांगा. संकटात कुटुंबच सर्वात मोठी ढाल ठरते. पीडितेच्या आईने दाखवलेल्या तत्परतेमुळे मुलीचा जीव वाचला असला तरी, तिला झालेले जखमा भरणे कठीण आहे. अशा नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, हीच संपूर्ण देशाची मागणी आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+