VIDEO: मुले जेवण करत असताना अचानक वर्गाची भिंत कोसळली, हृदयद्रावक घटना CCTV कॅमे-यात कैद
Vadodara School classroom Wall collapsed : गुजरातमधील वडोदरा येथील एका शाळेत शुक्रवारी हृदयद्रावक घटना घडली. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थी वर्गात एकत्र बसून जेवण करत असताना वर्गाची भिंत पडली आहे. ही हृदयद्रावक घटना सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. या हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल लोक संताप व्यक्त करत आहेत.

दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये असे दिसत आहे की, जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थी शाळेत एकत्र बसले होते, त्यावेळी त्यांच्या वर्गाची भिंत कोसळली आणि 6 विद्यार्थी त्यांच्या डेस्कसह पहिल्या मजल्यावरून खाली पडले. बाकीची मुलं घाबरली आणि जीव वाचवण्यासाठी पळू लागली.
Gujarat Model is collapsing‼️#SHOCKING Half a dozen children were injured when a wall of a School Collapsed in Vadodara (#Gujarat). This accident happened during the lunch break.
— Dipankar Kumar Das (@titu_dipankar) July 20, 2024
To run every school, building safety certificate has to be obtained every year. Was the safety… pic.twitter.com/nxTe2gpWEU
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ वडोदरा येथील श्री नारायण विद्यालयातील आहे. शुक्रवारी वर्गातील मुले जेवणाच्या सुट्टीत टिफिन घेत असताना ही घटना घडली. अचानक भिंत कोसळली आणि शेजारी बसलेली मुले त्यांच्या डेस्कसह खाली पडली, तर उर्वरित मुले जीव वाचवून वर्गाबाहेर पळताना दिसत आहेत.
पहिल्या मजल्यावर असलेल्या वर्गखोलीची भिंत कोसळल्याने त्यांच्या डेस्कसह खाली पडलेल्या सहा मुलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
व्हिडिओ पाहून संतापले यूजर
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर लोक सरकार आणि शाळा प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत, एका यूजरने लिहिले आहे की, विकास गुजरातमध्ये आवाज काढत आहे!'अशाच प्रकारे विधानसभा आणि संसदेच्या भिंती पडल्या तर गोष्ट होईल.' असं एका यूजरने लिहिलं आहे. दुसऱ्या युजरने उपरोधिकपणे लिहिले, 'भाऊ, भिंतही फाफडा खाखरा पासून बनवली आहे, हे गुजरात मॉडेलमध्ये आहे का..?












Click it and Unblock the Notifications