Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gudi Padwa 2025 : गुढीपाडवा का साजरा केला जातो?, हिंदू नववर्ष का म्हणतात, जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Gudi Padwa 2025 What is the Importance and History of Gudi Padwa : गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. महाराष्ट्रात गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या दारावर गुढी उभारली जाते आणि मराठी नव वर्षाची सुरुवात अतिशय आनंददायी वातावरण केली जाते.

यंदाची अर्थात गुढीपाडवा-2025 ची सुरुवात कधी होणार आहे, त्यामागील नेमका इतिहास काय, गुढीपाडवा का साजरा केला जातो, या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या बातमीतून मिळणार आहे.

यावर्षी गुढीपाडवा कधी, तारीख अन् तिथी काय

या वर्षी गुढीपाडवा रविवार, 30 मार्च 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. पंचांगानुसार, प्रतिपदा तिथी 29 मार्च 2025 रोजी दुपारी 4:27 वाजता सुरू होईल आणि 30 मार्च 2025 रोजी दुपारी 12:49 वाजता संपेल.

या दिवशी मराठी शक संवत 1947 सुरू होईल. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्र योग तयार होतो, जो संध्याकाळी 5:54 वाजेपर्यंत असेल. या शुभ योगात केलेली कार्ये यशस्वी होतात आणि ब्रह्मदेवाचा विशेष आशीर्वाद लाभतो, अशी धारणा आहे.

Gudi Padwa 2025

गुढीपाडव्याचा नेमका इतिहास काय?

गुढीपाडवा का साजरा केला जातो. गुढीपाडवा साजरा करण्यामागे प्रामुख्याने तीन कथा सांगितल्या जातात. हिंदू धर्मामध्ये या कथांमधील व्यक्तिरेखांचा मोठा सन्मान आहे. त्या चार पौराणिक कथा खालीलप्रमाणे आहे..!

ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केल्याचा दिवस

गुढीपाडवा हा सण नेमका का साजरा केला जातो, या सणाबाबत अनेक पौराणिक कथा आपण लहाणपणापासून आजोबा-आजींकडून ऐकलेल्या आहेत. त्या पौराणिक कथांमागे काही गोष्टी या वैज्ञानिक व बदलत्या वातावरणानुसार देखील मांडल्या जातात. हिंदू धर्मातील पौराणिक कथांनुसार, ब्रम्हदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानले जातो. हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ असल्याचे देखील मानले जाते.

राम अयोध्येत परतल्याचा दिवस म्हणून या सणाची परंपरा

त्याचबरोबर आणखी एक धार्मिक कथा देखील सांगितली जाते. ती म्हणजे, प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्येत परतले, त्यांच्या या विजयानंतर त्याचे जंगी स्वागत अयोध्येत करण्यात आले. त्यावेळी प्रत्येक घरावर गुढी उभारली गेली. अन् तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दिवस आहे, अशी भावना देखील लोकांची आहे.

सम्राट शालिवाहन यांचा विजयी दिवस

याव्यतिरिक्त अजून एका पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी सम्राट शालिवाहन याने हूणांचा पराभव करून आपले राज्य स्थापन करून शालिवाहन शक सुरु केले. त्यादिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता. म्हणून हा दिवस गुढीपाडवा दिवस व हिंदू नववर्षांचा पहिला दिवस मानला जातो.

गुढीपाडव्याचे महत्त्व

गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. या शुभ दिवशी अनेकजण नवीन व्यवसाय सुरू करतात, नवीन ध्येय ठरवतात आणि नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करतात. गाडी, सोने आणि अन्य नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो. तसेच, गुढीपाडव्याला पर्यावरणीय महत्त्व असून लोक निसर्गाचे आभार मानून त्याचे रक्षण करण्याचा संकल्प करतात

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+