Gudi Padwa 2025 : गुडीपाडव्याला कडूलिंबाच्या पानाचे आणि गुळाचे महत्व काय असते? हाच प्रसाद का असतो?
Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याचा सण मराठी नववर्षाचा आरंभ याच सणाच्या दिवसापासून होतो. अत्यंत पवित्र आणि मनात उत्साह आणणारा हा सण..या दिवशी नववर्षाची सुरुवात होते. या दिवशी अनेकजण संकल्पही करतात, नवीन वस्तू खरेदी करतात, मिष्ठान्न देतात आणि एकमेकांना सुखकर जीवनासाठी खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या जातात.
गुढी पाडवा सणाच्या दिवशी एका मोठ्या बांबूला साडी नेसून त्यावर तांब्या चढवून गुढीची पुजा केली जाते. घाटी चढवून प्रसाद दिला जातो आणि आरतीही ओवाळली जाते. खासकरुन या दिवशी कडुलिंबाचा गुर आणि गूळ याचे मिश्रण केलेला प्रसाद गुढीला नैवैद्य देऊन वाटला जातो. कडूलिंबाचा पांढरा गुर आणि गुळाचा प्रसाद महत्वाचा असतो. भारतीय परंपरेत हा प्रसाद वर्षातून एकदाच गुढी पाडव्याच्या दिवशी तयार केला जातो. गुळ आणि कडुलिंब आणि त्यांचे मिश्रण केलेल्या प्रसादाचे काय महत्व आहे हे आपण जाणून घेऊया.

गुढीपाडव्याला कडुलिंबाची पानाचे महत्व काय आहे?
कडुलिंबाचा थंडावा देणारा प्रभाव असतो जो शरीरातील उष्णता (पित्त) संतुलित करण्यास मदत करतो आणि त्याला कडू, तुरट चव असते, जी शरीरातील श्लेष्मा (कफ) काढून टाकण्यास मदत करते. प्रसादाचा आणखी एक महत्त्वाचा भाग असलेल्या गूळमध्ये एंजाइम असतात, जे कडुलिंबात मिसळल्यावर नैसर्गिक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.
गुळासोबत सेवन
गुळासोबत कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरातील हानिकारक घटक बाहेर काढले जातात.
गुढी सजावटीसाठी कडूलिंबाचा वापर
गुढी उभारताना कडुलिंबाची पाने वापरली जातात, जी सजावटीसाठी आणि शुभ मानली जातात.
गुढीचा प्रसाद
कडुलिंबाची पाने, फुले, गूळ आणि नारळ एकत्र करून प्रसाद बनवला जातो.
कडूलिंबाची पानाचे आरोग्यविषयक फायदे
कडूलिंबाच्या पानाचे महत्व आरोग्यात फार आहे. त्याचे मोठे फायदेही आहेत. मुरुम, डाग, टॅनिंग, निस्तेज आणि कोरडी त्वचा यासारख्या त्वचेच्या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी कडुनिंबाचा वापर केला जातो. आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, विषाणूजन्य ताप, सर्दी, खोकला आणि घसादुखी बरा करण्यासाठी फंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांनी युक्त कडुलिंबाचे सेवन केल्यास तात्काळ आराम मिळतो.
गूळ खाण्याचे आरोग्याचे फायदे
- गूळ वजन कमी करण्यास मदत करतो, त्यात असलेले पोटॅशियम स्नायूंमध्ये इलेक्ट्रोलाइट्स राखण्यास मदत करते. निरोगी आहारासाठी साखरेचा हा सर्वोत्तम पर्याय आहे.
- श्वासोच्छवासाच्या समस्या टाळतात
- दररोज गुळाचे सेवन केल्याने खोकला किंवा दमा आणि ब्रॉन्कायटिस सारख्या श्वसनमार्गाचे संक्रमण होण्याची शक्यता कमी होते.
- यकृत डिटॉक्सिफाय करते
- गूळ हे एक उत्कृष्ट क्लिंजर आहे, जे यकृतातील अशुद्धता काढून टाकून यकृताला चांगले कार्य करण्यास मदत करते.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications