Gudi Padwa 2025: गुढीपाडवा कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त कधी, पूजा कशी करायची, जाणून घ्या सर्व काही
Gudi Padwa 2025 Time shubh muhurat puja vidhi in Marathi : हिंदू नववर्षाचा प्रारंभ ज्या दिवसाने होतेो त्या दिवसाला गुढीपाडवा असतो.दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढी पाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसाच महाराष्ट्रात देखील गुढीपाडव्याचा सणाला अनन्य साधारण महत्त्व असते. या दिवसापासून चैत्र नवरात्रीलाही सुरुवात होते. यंदाचा म्हणजेच 2025 या वर्षातील गुढीपाडवा नेमका कधी आहे? तारीख, शुभ मुहूर्त कधी, याविषयी शंका असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.
यंदाचा गुढीपाडवा कोणत्या तारखेला, काय आहे शुभ मुहूर्त
ज्योतिषांच्या मते, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4:27 वाजता सुरू होईल आणि 30 मार्च रोजी दुपारी 12:49 वाजता समाप्त होईल. सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते. त्यामुळे गुढीपाडवा 30 मार्च रोजी सर्वत्र साजरा केला जाणार आहे.

चैत्र नवरात्रीलाही होतो प्रारंभ!
गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात. तसेच, ते मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलांचे, आंब्याच्या पानांचे तोरण लावतात. याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते.
ज्योतिष शास्त्राच्या नुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्याच्या कृपेने साधकाचे सुख व सौभाग्य वाढते.
गुढीपाडवा सणाचा मुहूर्त कधी?
- ब्रह्म मुहूर्त - 04:41 पहाटे ते 05:27 पहाटे
- विजय मुहूर्त - दुपारी 02:30 ते 03:19 पर्यंत
- संध्याकाळची वेळ - संध्याकाळी 06:37 ते 07
- अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:01 ते 12:50 पर्यंत
- निशिता मुहूर्त- सकाळी 12:02 ते दुपारी 12:48 पर्यंत
शुभ योगात साजरा होईल गुढीपाडवा!
गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्र योग तयार होतोय. या योगाचा योग संध्याकाळी 5:54 पर्यंत आहे. या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते. तसेच ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी मान्यता आहे. या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्धी योगाचाही योगायोग होत आहे.
31 मार्च रोजी दुपारी 04:35 ते 06:12 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. ज्योतिषशास्त्र सर्वार्थ सिद्धी योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानते. तर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचकची वेळ सकाळी 06:13 ते दुपारी 04:35 पर्यंत असते. याशिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी बव, बलव आणि कौलव करण होण्याची शक्यता आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशीचे काय सांगते पंचांग
सूर्योदय - सकाळी 06:13
सूर्यास्त - संध्याकाळी 06:38
चंद्रोदय- सकाळी 06:34
चंद्रास्त - संध्याकाळी 07:50












Click it and Unblock the Notifications