छातीचा भाग पकडणे, पायजम्याचा नाडा तोडणे बलात्काराचा प्रयत्न नाही नाही! - अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय
Allahabad High Court decision : बलात्काराच्या प्रयत्नाच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायलयाने एक मोठा निर्णय दिली आहे. स्तन पकडणे, पायजम्याचा नाडा तोडणे हे बलात्काराच्या प्रयत्नासाठी पुरेसे नाही, या कृत्यांसाठी आरोपी असलेल्या दोन व्यक्तींविरुद्ध ट्रायल कोर्टाने तयार केलेल्या आरोपांमध्ये सुधारणा करण्याचे आदेशही अलाहाबाद न्यायालयाने दिले आहेत.
यासंदर्भात द हिंदूने वृत्त दिले आहे, त्यानुसार, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, "बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप लावणे यामध्ये हे सिद्ध करणे आवश्यक आहे की बलात्काराचा प्रयत्न आणि गुन्हा यातील अंतर योग्य रितीने समजणे आवश्यक आहे.

कासगंज अंतर्गत येणाऱ्या पटियाली पोलिस ठाण्यात यासंदर्भात एक गुन्हा नोंदवण्यात आला होता, यामध्ये संशयित आरोपी आकाश आणि इतर दोघांवर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि बाललैंगिक शोषण विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद आहे, यादरम्यान संशयितांनी हायकोर्टात पूर्नविचार याचिका दाखल केली होती.
अलाहाबाद उच्च न्यायलय काय म्हणाले?
मुलीचे स्तन पकडणे, तिच्या पायजमाचा नाडा तोडणे आणि तिला पुलाखाली ओढून नेण्याचा प्रयत्न करणे हे बलात्कार किंवा बलात्काराच्या प्रयत्नासाठी गुन्हेगार ठरवण्यासाठी पुरेसे नाही, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने या आठवड्यात सांगितले,
2021 मध्ये घडली होती घटना
ही घटना 2021 मध्ये घडली होती, यातील संशयितांने पीडित मुलीला लिफ्टची ऑफर दिली आणि नंतर तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, तिच्या नातेवाईकांनी अशी पोलिस तक्रार दाखल केली होती.
आयपीसीच्या कलम 376 अन्वये कोणताही गुन्हा घडला नसल्याचा युक्तिवाद करून आरोपींनी ट्रायल कोर्टाच्या समन्सला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याने दावा केला की जरी त्याच्याविरुद्धची तक्रार गांभीर्याने घेतली गेली तरी, आरोप IPC च्या कलम 354 आणि 354(B) (हल्ला करणे किंवा कपडे काढून टाकण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी बळाचा वापर) आणि POCSO कायद्याच्या संबंधित तरतुदींच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत.
उच्च न्यायालयाने 17 मार्च 2025 रोजीच्या आपल्या आदेशात म्हटले आहे की, आरोपींवर लावण्यात आलेले आरोप आणि प्रकरणातील तथ्य हे बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यासारखे नाही.
न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, "बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप करण्यासाठी फिर्यादीने हे सिद्ध केले पाहिजे की ते तयारीच्या टप्प्याच्या पलीकडे गेले आहे. तयारी आणि गुन्हा करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न यातील फरक हा मुख्यत्वे मोठ्या प्रमाणात निर्धाराचा विषय आहे."












Click it and Unblock the Notifications