Gopal Khemka Murder : बिहारमधील खेमका हत्याकांडात खुलासा, कोणी दिली सुपारी, का केली हत्या!
Gopal Khemka Murder Case : बिहारची राजधानी पाटणा येथे व्यापारी गोपाल खेमका यांच्या हत्येमागील रहस्य आता उलगडले आहे. या हाय-प्रोफाईल हत्येचा छडा अवघ्या 4 दिवसांत लावण्यात आला.
IPS कुंदन कृष्णन, जे सध्या STF प्रमुख आणि एडीजी (मुख्यालय) आहेत, यांच्या नेतृत्वाखालील एसटीएफ आणि एसआयटीच्या जलद व निर्णायक कारवाईमुळे हत्येचा सूत्रधार आणि संपूर्ण गुन्हेगारी जाळं उघडकीस आले.
बंदूक पुरवठादार विकास चकमकीत ठार
मुख्य शूटर उमेश उर्फ विजय याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर, मंगळवारी पहाटे एसटीएफचे पथक मालसलामी परिसरात बंदूक पुरवठादार विकास उर्फ राजा याला अटक करण्यासाठी पोहोचले. मात्र विकासने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात झालेल्या चकमकीत विकास ठार झाला. घटनास्थळी पोलिसांनी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि गोळ्यांचे खोके जप्त केले. विकासवर आधीपासूनच अनेक गंभीर गुन्हे दाखल होते.

बिल्डर अशोक साह हत्येचा सूत्रधार
पोलिस तपासात उघड झाले की, बिल्डर अशोक साह हाच गोपाळ खेमका यांच्या हत्येचा सूत्रधार होता. खेमका आणि साह यांच्यात पूर्वीपासून व्यावसायिक वाद सुरू होता. या वादातूनच अशोक साहने व्यावसायिक शूटर उमेश याला १ लाख रुपये अॅडव्हान्स देऊन खून करण्याचे कंत्राट दिले. 4 जुलै रोजी, उमेशने खेमका यांना त्यांच्या अपार्टमेंटच्या गेटवर गोळी झाडून ठार केले.
मुख्य शूटर उमेश अटकेत, महत्त्वाचे खुलासे
एसटीएफ आणि एसआयटीच्या संयुक्त कारवाईत, मुख्य शूटर उमेश उर्फ विजय याला पाटणा शहरातील मालसलामी भागातून अटक करण्यात आली. त्यावेळी तो आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी बाहेर पडला होता.
अटकेनंतर त्याने कबूल केले की, त्याला 1 लाख रुपये अॅडव्हान्स मिळाले होते, आणि हत्येनंतर तो दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत होता.
पोलीसांनी तपासादरम्यान, एसटीएफने आरोपींकडून हत्येत वापरलेले पिस्तूल, दुचाकी, 80 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल फोन, 1 लाख रुपये रोख रक्कम आणि गंगा नदीच्या काठावरून आणखी एक शस्त्र जप्त केले आहे.
IPS कुंदन कृष्णन यांचे नेतृत्वात तपासाला वेग!
IPS कुंदन कृष्णन यांच्या रणनीतिक नेतृत्वाखाली झालेली ही कारवाई अत्यंत प्रभावी ठरली. केवळ मुख्य शूटर उमेशलाच नव्हे, तर संपूर्ण कट रचणाऱ्यांना देखील अटक करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखालील तपासात, पाटणा जंक्शनवरून एक संशयित ताब्यात घेण्यात आला आणि कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील उदयगिरी अपार्टमेंटवर छापा टाकून आणखी तीन जणांना अटक करण्यात आली. IPS कुंदन कृष्णन हे त्यांच्या वेगवान, अचूक आणि निर्णायक कारवायांसाठी प्रसिद्ध आहेत. या प्रकरणात त्यांनी दाखवलेले नेतृत्व गुन्हेगारी जगतात एक ठोस संदेश देणारे ठरले आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications