कुंभमेळ्यात एकामागून एक सुरु आहेत गॅस सिलेंडर्सचे स्फोट; परिसरात आगीचे लांब लांब लोट

कुंभमेळ्याच्या सेक्टर पाचमध्ये आज दुपारी भीषण आग लागली. समोर आलेल्या माहितीनुसार गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. या आगीच २० ते २५ तंबू जळून खाक झाल्याचे समजते. दरम्यान, अग्नीशामक दलाच्या जवानांनी सध्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

Kumbh Mela 2025

नेमके काय घडले?

प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा सुरू आहे. महाकुंभ मेळ्याच्या सेक्टर पाचमध्ये ही भीषण आग लागली. एका तंबूमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर ही भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत 20 ते 25 तंबू जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, सहा गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात येत आहे.

कोठे लागली आग?

ही आग प्रयागराजमधील शास्त्री पूल आणि रेल्वे पुलाच्यामध्ये लागली. हा सर्व परिसर महाकुंभ मेळा क्षेत्रात येतो. आगीनं रौद्र रूप धारण केलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे. या ठिकाणी अनेक तंबू असून, त्या प्रत्येक तंबूत सिलेंडर्स असल्याने आग विझवायला अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. या सिलिंडरचे एका मागून एक स्फोट होत असल्याचेही काहींचे म्हणणे आहे. ही आग आधिकच भडकली आहे. अचानक आग लागल्यामुळे महाकुंभ मेळ्यावत चांगलाच गोंधळ उडाला असून, लोक सुरक्षित जागी स्थलांतर करत आहेत.

जिवितहानी टळली

एनडीआरएफ आणि पोलीस दलाचं पथक देखील घटनास्थळी दाखल झालं असून, ज्या ठिकाणी आग लागली आहे, तेथील सर्व परिसर खाली करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आलं आहे. या आगीमध्ये मोठी वित्तहानी झाली आहे, मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची बातमी समोर आली आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे. त्या ठिकाणी हवा देखील अधिक वेगानं वाहत आहे, त्यामुळे आग अधिकच भडकली आहे. त्यातच तंबूत ठेवलेल्या सिलिंडरचा एका मागून एक स्फोट होत असल्यानं आग पसरण्याचा धोका आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+