Ganesh Chaturthi Wishesh : बाप्पाच्या आगमनाचे करा स्वागत, मित्र-प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा!
Ganesh Chaturthi 2025 Wishes In Marathi : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला (Ganesh Chaturthi) गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी ढोलताशांच्या गजरात गणरायांचे वाजत गाजत घरोघरी स्वागत केलं जातं. त्यानुसार, 27 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजेच आज बुधवारी गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातोय. आज घरोघरी गणपती बाप्पांचे स्वागत केले जात आहे.
सण म्हटला की, मित्र-परिवाराला, नातेवाईकांना शुभेच्छा देणं आलंच. सध्या लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देतात. याच निमित्ताने तुम्हाला सुद्धा जर तुमच्या मित्र-मैत्रीणींना शुभेच्छा द्यायच्या असतील तर हे शुभेच्छा संदेश तुम्ही नक्की पाठवू शकता.
गणेश चतुर्थी हा सण फक्त एक धार्मिक उत्सव नाही, तर तो आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. या सणाला तुम्ही तुमच्या नातेवाईक मित्र-मैत्रिणींना अनंत शुभेच्छा संदेश पाठवून या दिनाचा उत्साह साजरा करू शकता.

बाप्पाचं आगमन, आनंद घेऊन!
गणेश चतुर्थीचा उत्साह म्हणजे बाप्पाच्या आगमनाची चाहूल. गणपती बाप्पा आपल्यासोबत सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येतात. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत आपण याच आनंदाची आणि आशीर्वादाची वाट पाहतो.
सण आपल्या संस्कृतीचा आणि एकतेचा!
गणेश चतुर्थी हा केवळ एक मूर्ती स्थापनेचा सोहळा नाही. हा सण आपल्याला एकत्र आणतो. आरती, मोदक आणि सामूहिक कार्यक्रमांमधून आपली एकता अधिक घट्ट होते. हा सण आपल्याला परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दाखवतो.
बुद्धीची देवता, संकटांचा विघ्नहर्ता!
गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने केली जाते. या गणेश चतुर्थीला आपण फक्त बाप्पाचे स्वागतच करत नाही, तर आपल्या जीवनातील सर्व संकटे आणि अडथळे दूर करण्यासाठी त्याची प्रार्थना करतो.
डिजिटल युगातील गणेशोत्सव!
आजच्या डिजिटल युगात गणेशोत्सव साजरा करण्याची पद्धत बदलली आहे. लोक 'ई-बाप्पा' आणि ऑनलाइन दर्शन घेऊन हा सण साजरा करत आहेत. यामुळे हा सण केवळ घरापुरता मर्यादित न राहता, जगभरातील लोकांपर्यंत पोहोचला आहे.
पर्यावरणाची काळजी घेणारा बाप्पा!
आजकाल 'इको-फ्रेंडली' गणेशोत्सव साजरा करण्याचा ट्रेंड वाढला आहे. शाडूच्या मूर्ती, नैसर्गिक रंग आणि कमीत कमी प्रदूषण करणाऱ्या सजावटीवर भर दिला जात आहे. हा बदल आपल्याला पर्यावरणाची काळजी घेण्यास प्रोत्साहित करतो.
घरोघरी बाप्पा, मनात आनंद!
गणेश चतुर्थी म्हणजे घरात आलेला एक नवीन पाहुणा.
दहा दिवस घराला एक वेगळीच शोभा आणि चैतन्य येते.
या दिवसांत कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात
आणि प्रत्येक क्षण खास बनवतात.
गणपती बाप्पा, माझ्यासोबत!
गणपती हे एक असे दैवत आहे,
जे प्रत्येकाला आपलेसे वाटते.
त्यांच्याकडे पाहिल्यावर एक सकारात्मक ऊर्जा मिळते.
'बाप्पा माझ्यासोबत आहे',
ही भावनाच अनेक संकटांवर मात करण्याची ताकद देते.
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
स्वर्गातही मिळणार नाही ते सुख
तुझ्या चरणाशी आहे...
संकट असू दे कितीही मोठे
तुझ्या नावात सर्वांचे समाधान आहे...
गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत
तुमचे सर्व दु:ख संकटे दूर होवोत
श्री गणपती बाप्पा तुमच्या घरी येवो
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
मोदकांचा प्रसाद ,
लाल फुलांचा हार ,
नटून - थटून बाप्पा तयार,
वाजत गाजत बाप्पा घरात,
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव सर्वांना...
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा...!
सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!
हार फुलांचा घेऊनी वाहू चला हो गणपतीला,
आद्य दैवत साऱ्या जगाचे,
पूजन करुया गणरायाचे
गणपती बाप्पा मोरया!
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीचे सेवा करु काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि
तन्नो बुदि्ध प्रचोदयात।।
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!












Click it and Unblock the Notifications