Gandhi Jayanti 2024 Wishes:'कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमानं जिंका', खास संदेश तुमच्यासाठी
Gandhi Jayanti 2024: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. दरवर्षी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते. तर संपूर्ण जगभरात हा दिवस 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. कारण बापूंनी संपूर्ण जगाला सत्य आणि अहिंसेचा धडा शिकवला होता.
महात्मा गांधी यांचे विचार आजही लोकांना जीवनात पुढे जाण्यास मदत करतात. महात्मा गांधी हे केवळ एका विशिष्ट व्यक्तीचे नाव नसून ते एका विश्वासाचे आणि वचनाचे नाव आहे.
सुंदर आणि खास संदेशांद्वारे तुम्ही आजचा दिवस खूप अविस्मरणीय बनवू शकता. येथे आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर संदेश सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना पाठवू शकता.

जगाला अहिंसा, सत्य आणि सहिष्णुताची शिकवण देणार्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन!
'रघुपती राघव राजाराम... पतित पावन सीताराम'..गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
'अहिंसा हाच परम धर्म आहे.' गांधी जयंतीच्या शुभेच्छा.
'स्वच्छ भारत, सशक्त भारत', गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच', गांधी जयंतीच्या शुभेच्छा.
'जगात तुम्ही जो बदल पाहू इच्छिता तो व्हा', गांधी जयंतीच्या शुभेच्छा.
'कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमानं जिंका'.. गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
'महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पालन करून, गांधी जयंतीच्या शुभेच्छा.
"सत्य हाच देव आहे.", गांधी जयंतीच्या शुभेच्छा.
'आम्हाला तलवारीशिवाय आणि ढालीशिवाय स्वातंत्र्य दिले'... गांधी जयंतीच्या शुभेच्छा.
'भज प्रिय सीताराम, ईश्वर अल्ला तुझ्या नावाने, ईश्वर सर्वांचे कल्याण करो.'
महात्मा गांधींचे विचार
"करा किंवा मरा": हा नारा 1942 च्या "भारत छोडो" आंदोलनात महात्मा गांधी यांनी दिला होता.
"अहिंसा परमो धर्म" गांधीजींचा असा विश्वास होता की, हिंसा हा कोणत्याही समस्येवर उपाय असू शकत नाही.
"सत्य ईश्वर आहे": सत्य हा मानवी आत्म्याचा सर्वात मोठा गुण आहे.
"तुम्ही जगात जो बदल पाहू इच्छिता तो व्हा."
"साधी राहणी, उच्च विचारसरणी"












Click it and Unblock the Notifications