माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, २१ तोफांची सलामी
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आज (२८ डिसेंबर) दिल्लीतील निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, रामदास आठवले, सोनिया गांधी, राहुल गांधी यांसह संपूर्ण गांधी कुटुंब यावेळी उपस्थित होते. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे.

तिन्ही दलाकडून सलामी
डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी काल ठेवण्यात आले होते. तेथे अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. आज सकाळी त्यांचे पार्थिव काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले. तेथेही त्यांच्या पार्थिवाचे अनेकांनी दर्शन घेतले. काँग्रेस मुख्यालयापासून निगम बोध घाटाकडे आज पार्थिव रवाना झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिन्ही दलाकडून त्यांना सलामी देण्यात आली.
पार्थिवावर ठेवला तिरंगा
डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारावेळी विशिष्ट प्रोटोकॉलचेही पालन करण्यात आले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज तिरंगा ठेवण्यात आला होता. त्यासोबतच अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना २१ तोफांची सलामी दिली गेली. यानंतर या ठिकाणी उपस्थितीत असलेल्या सर्व राजकीय नेत्यांनी अभिवादन केले. यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी उपस्थितीत असलेल्या सर्वांना अश्रू अनावर झाले होते.


Click it and Unblock the Notifications