Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Friendship Day 2025 Wishes for Husband: तुमच्या पतीला फ्रेंडशिप डेच्या द्या शुभेच्छा; खास संदेश वाचा

Friendship Day 2025 Wishes for Husband in marathi : पती एक असा मित्र असतो ज्याला मैत्रीच्या नात्यात नेहमीच साधारण समजले जाते, पण तो मित्रांपेक्षा काही कमी नसतो. मित्र कधी कधी हात सोडतात, पण कितीही भांडण-तंटे होऊ द्या, कितीही राग-राग असो पण पती पत्नीची कधीच साथ सोडत नाही, संकटकाळात तर तो स्वतः संकटं झेलतो आणि पत्नीला आपल्या पंखाखाली अलगद संरक्षित करतो.

अशा पतीसाठी तुम्हाला जर थँक्स म्हणायचे असेल, त्याचे आभार मानायचे असतील तर तुमच्यासाठी फ्रेंडशिप डे ही एक खास संधी आहे, पतीला मित्रांपेक्षाही वरचढ स्थान आहे आणि तो नेहमी हे आदर्शपणे दाखवून देतो, अशा पतीसाठी तुम्ही खास शुभेच्छा देऊन दोघांचे प्रेम अधिक वृद्धींगत करु शकता. त्यासाठीच आम्ही खाली पतीसाठी मराठीतील खास शुभेच्छा संदेश देत आहोत.

Friendship Day 2025 Wishes for Husband

१. पती माझा, मित्रही माझा!

"ज्याप्रकारे तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि प्रत्येक गोष्टीत पुढे जाण्यासाठी मला प्रोत्साहन देता, तुम्ही फक्त माझे पतीच नाही, तर माझे सर्वात चांगले मित्रही आहात. आपल्या या मैत्रीला 'हॅपी फ्रेंडशिप डे'!"

"मैत्री अशी असावी की ती काळजात वसावी, श्वास घेतला तरी त्यात माझ्या मित्राचा सुगंध यावा. 'हॅपी फ्रेंडशिप डे'!"

२. आयुष्याला खरा अर्थ देणारा मित्र

"तुमच्या पतीमध्येच जर तुम्हाला एक चांगला मित्र सापडला, तर आयुष्य सोपे होऊन जाते. माझ्या सर्वात चांगल्या मित्राला 'फ्रेंडशिप डे'च्या खूप खूप शुभेच्छा!"

३. मैत्रीमुळे यशस्वी झालेला संसार

"एखादं लग्न तेव्हाच यशस्वी होतं, जेव्हा पती-पत्नीमध्ये घट्ट मैत्रीही असते. म्हणूनच आपलं लग्न इतरांसाठी एक उदाहरण आहे. 'हॅपी फ्रेंडशिप डे'!"

४. माझा आधारस्तंभ

"तुम्ही माझ्याबद्दल सर्व काही जाणता, आपल्या नात्याबद्दल सर्व काही जाणता. म्हणूनच, माझ्या प्रिय, तुम्ही माझ्यासाठी खूप खास आहात."

५. मैत्रीला नजर लागू नये!

"आपल्या मैत्रीलाही एका ताईतची गरज आहे, कारण ती थोडीशी दिसली की लगेच नजर लागते."

६. खास व्यक्तीसोबत मैत्री

"मैत्री कधी खास लोकांशी होत नाही, पण ज्यांच्याशी मैत्री होते ती माणसे खास होतात. 'हॅपी फ्रेंडशिप डे'!"

७. तुझ्या आनंदापेक्षा काहीच महत्त्वाचे नाही

"तुझ्या आनंदापेक्षा माझ्यासाठी काहीच महत्त्वाचे नाही, जर तू नसशील, तर विश्वास ठेव, मी पण नाही."

८. माझ्या जीवनसाथीसाठी प्रार्थना

"आकाशात तुझ्या नजरा असाव्यात, पायदळी तुझ्या यश असावे, आज 'मैत्री'चा दिवस आहे, तू नेहमी आनंदी राहावी हीच माझी प्रार्थना!"

९. विसरू न शकणारी मैत्री

"विसरण्याचा प्रयत्न केला तरी माझी आठवण येईल, काळोखातही माझा चेहरा दिसेल. माझ्यापेक्षा चांगला मित्र शोधायला निघालो, तर शोध माझ्यापासूनच सुरू होऊन माझ्यावरच संपेल."

१०. आरसा आणि सावलीसारखा मित्र

"आरसा आणि सावलीसारखा मित्र ठेवा, कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही."

११. देवाचे खास गिफ्ट

"आकाशातून तारा तोडून दिला आहे, एकटेपणात एक दिवा दिला आहे. माझे नशीबही माझ्यावर गर्व करते, कारण देवाने मित्रच इतका खास दिला आहे."

१२. अमूल्य मैत्री

"स्मितहास्याची कोणतीही किंमत नसते, काही नात्यांना मोल नसते. मित्र रस्त्यावर अनेक मिळतात, पण तुमच्यासारखा अनमोल कोणीच नसतो."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+