माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली; परिस्थिती नाजूक असल्याची माहिती
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉ. मनमोहन सिंग हे सध्या ९२ वर्षांचे असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.

मनमोहनसिंग रुग्णालयात
डाँ. मनमोहन सिंग हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते माजी पंतप्रधान राहिलेले आहेत. आज त्यांची तब्बेत जास्त बिघडल्याने त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून, त्यांना रुग्णालयात का दाखल कऱण्यात आले, हे मात्र समजू शकले नाही.
"Deeply concerned about the health of Former Prime Minister Dr. Manmohan Singh ji. Wishing him a speedy recovery and good health," posts senior Congress leader Ashok Gehlot (@ashokgehlot51). pic.twitter.com/NOzaHkFvjG
— Press Trust of India (@PTI_News) December 26, 2024
गेहलोत यांची पोस्ट
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या वृत्ताला दुजोरा देणारी पोस्ट एक्सवर टाकली आहे. "डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीविषयी काळजी वाटते. त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवोत, अशी प्रार्थना करतो", अशी पोस्ट त्यांनी एक्सवर टाकली आहे.












Click it and Unblock the Notifications