Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन, एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात देशवासीयांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. माजी पंतप्रधान व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं गुरुवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. आज अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनाचा त्रास होत असल्याने उपचार सुरु होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. अखेर रात्री उशीरा त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आले.

Manmohan Singh

गांधी कुटुंब रुग्णालयात

श्वसनास त्रास होत असल्याने मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यानंतर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी या एम्स रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली. यानंतर आता मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची दुर्देवी बातमी समोर आली आहे.

प्राध्यापक ते पंतप्रधान

डाँ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह येथे झाला. ते अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठसारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतले. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. मनमोहन सिंह 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते. त्यानंतर ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते.

पंतप्रधान मोदींकडून विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह यांच्या कुटुंबियांना फोन करुन विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हे एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच अनेक दिग्गज नेते एम्स रुग्णालयात दाखल होत आहे. पोलिसांकडून आता दिल्लीतील एम्स रुग्णालयाचा परिसर मोकळा करण्याचं काम सुरु झालं आहे. दरम्यान, काँग्रेसची उद्या बेळगावात होणारी सभा रद्द करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी हेही दिल्लीच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+