Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार

Former PM Manmohan singh funeral: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी नवी दिल्लीतील निगमबोध घाटावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी 26 डिसेंबर रोजी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले.

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर 28 डिसेंबर (शनिवार) सकाळी 11.45 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्यांचे पार्थिव अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) मुख्यालयात सकाळी 8.30 वाजता सार्वजनिक श्रद्धांजलीसाठी आणले जाईल.

dr manmohan singh

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्मशानभूमीवर स्मारक बांधण्याचा विचार करण्याची विनंती केली आहे. पक्षाचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केले आहे की डॉ.सिंग यांचा शेवटचा प्रवास एआयसीसी मुख्यालयातून सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल. डॉ सिंह यांच्या स्मरणार्थ सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

राष्ट्रध्वजात गुंडाळलेले डॉ.मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू रोडवरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. जिथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशातील राजकारणी आणि मान्यवर मंडळी जमली होती.

पंतप्रधान मोदी यांनी सर्वप्रथम श्रद्धांजली वाहिली. डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झालं आहे. एक अर्थशास्त्रज्ञ आणि नेता म्हणून त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्यासह माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रद्धांजली वाहिली.

डॉ.मनमोहन सिंग यांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. एका व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदींनी सिंह यांचा फाळणीनंतरच्या संघर्षापासून ते भारताच्या प्रगतीतील महत्त्वाचा व्यक्तिमत्त्व बनण्यापर्यंतचा प्रवास अधोरेखित केला.

26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाब प्रांतात जन्मलेले डॉ. सिंह फाळणीनंतर भारतात आले. त्यांनी केंब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये अर्थशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले, नंतर ते एक प्रतिष्ठित अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी बनले. भारताच्या आर्थिक सुधारणांमध्ये त्यांच्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे सिंग यांचे दिल्लीतील एम्स येथे निधन झाले आणि त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+