Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी: छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाच्या घरावर ईडीचे छापेमारी

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज (ता.10 मार्च) रोजी पहाटे छापा टाकला आहे. भिलाई येथील त्यांच्या निवासस्थानी हा छापा टाकण्यात आला.

दरम्यान ईडीकडून छत्तीसगडमधील एकूण 14 ठिकाणी छापे सुरु आहे. कथित आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंग प्रकरणांच्या संदर्भात ही कारवाई केली जात आहे. हे दारू घोटाळ्याशी जोडलेले असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसने याला राजकीय षड्‍यंत्र असल्याचं म्हटले आहे.

bhupesh baghel

भूपेश बघेल मुख्यमंत्री असताना छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात दारू घोटाळ्याचे आरोप झाले होते. हा घोटाळा सुमारे 2161 कोटी रुपयांचा असल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत या प्रकरणात अनेक प्रमुख अधिकारी आणि एका माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. छत्तीसगड दारू घोटाळ्याच्या प्रकरणाची ईडी चौकशी करत आहे. भूपेश बघेल हे 2018 ते 2023 दरम्यान छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते.

भूपेश बघेल यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर आणखी दोन मोठे आरोप झाले आहेत. महादेव सट्टा अॅप आणि कोळसा कर घोटाळ्यातही त्यांच्यावर अनियमिततेचा आरोप आहे. कोळसा आकारणी घोटाळा सुमारे 570 कोटी रुपयांचा असल्याचे बोललं जातं आह. 2023 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता.. सध्या ते काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत.

खोटा खटला दाखल केला, भूपेश बघेल यांचं ट्टिट

छाप्यानंतर भूपेश बघेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की जेव्हा सात वर्षांपासून सुरू असलेला खोटा खटला न्यायालयात फेटाळण्यात आला तेव्हा ईडीच्या पाहुण्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर छापा टाकला. त्यांनी पुढे लिहिले की, जर कोणी या कटाद्वारे पंजाबमध्ये काँग्रेसला रोखण्याचा प्रयत्न करत असेल तर तो गैरसमज आहे, असं या ट्टिटमध्ये म्हटलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+