माजी पोलिस महासंचालक ओमप्रकाश यांच्या हत्येत नवा खुलासा! जेवताना मिरची पावडर फेकली, 10-12 चाकूचे वार
Former DGP Omprakash murder case : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) ओमप्रकाश यांची हत्या झाली. या हत्येने फक्त कर्नाटकातच नाही तर देशात खळबळ माजली. खुद्द कायद्याच्या रक्षकालाच अशा निर्दयतेने मारले गेले.
मूळचे बिहारमधील चंपारणचे रहिवासी असलेले ओमप्रकाश यांच्याकडे एकेकाळी संपूर्ण कर्नाटकात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी होती...आता त्यांचाच मृतदेह त्यांच्या घरात रक्ताने माखलेला आढळून आला. या हत्येचा आरोप त्याची पत्नी पल्लवी हिनेही केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

माजी महासंचालकांच्या हत्येत मोठे खुलासे
माजी डीजीपी ओम प्रकाश यांच्या मृत्यूप्रकरणी आता धक्कादायक बाब समोर आली आहे. बंगळुरू पोलिसांनी ओम प्रकाश यांची पत्नी पल्लवी आणि मुलगी क्रिती यांना खुनाच्या आरोपाखाली ताब्यात घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवीने ओम प्रकाश यांच्या हत्येची कबुली दिली आहे. मात्र, अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
घरगुती वाद झाला जीवघेणा..!
भांडणानंतर पत्नी पल्लवीने आधी ओमप्रकाशच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकली आणि नंतर चाकूने वार करून हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना बंगळुरूच्या पॉश भागात असलेल्या एचएसआर लेआउटमध्ये असलेल्या ओम प्रकाश यांच्या घरात घडली. त्यांची मुलगी क्रितीचीही चौकशी सुरू आहे. हा घरगुती वाद जीवघेणा कसा झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.
माजी डीजीपींच्या मुलाने तक्रारीत काय म्हटले?
माजी डीजीपी ओम प्रकाश यांचा मुलगा कार्तिकेश याने रीतसर तक्रार दाखल केल्यावर त्यांची हत्या उघडकीस आली. या हत्येत आई आणि मुलगी या दोघांचा हात असल्याचा आरोप मुलाने तक्रारीत केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी डीजीपी ओम प्रकाश यांची पल्लवीसोबत झालेल्या जोरदार वादानंतर हत्या करण्यात आली होती. ही हत्या रविवारी (20 एप्रिल) रात्री त्याच्या तीन मजली घराच्या तळमजल्यावर घडली, तेथे ओमप्रकाश रक्ताच्या थारोळ्यात सापडले. त्याच्या शरीरावर विशेषतः मानेवर आणि पोटावर चाकूच्या जखमा होत्या.
ओमप्रकाश यांच्यावर चाकूचे 10 ते 12 वार!
कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक ओमप्रकाश यांच्या हत्येचे फोटो समोर आले आहेत, त्यात ते रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर पडलेले होते. गळ्याला आणि पोटाला धारदार चाकूसारख्या हत्याराचे निशान होते आणि त्यांचे कपडेही फाटलेले दिसले.
जेवण करताना तोंडावर फेकली मिर्ची
पोलिसांनी सांगितल्यानुसार, कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक ओमप्रकाश यांची हत्या ज्यावेळी झाली तेव्हा ते जेवण करत होते, जेवणावेळी त्यांच्या तोंडावर मिरचीची भुकटी फेकण्यात आली, त्यानंतर दहा ते बारा चाकूसारख्या हत्याराचे घाव करण्यात आले होते.












Click it and Unblock the Notifications