पाकिस्तानशी युद्ध झाल्यास भारताची हार निश्चित! काँग्रेस नेत्याचे विधान, नंतर म्हणाले अकाऊंट हॅक झाले
Former Congress MP UD Minz's statement : पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यावर आता विविध प्रतिक्रियाही येत आहे. अशातच पाकिस्तानशी युद्ध झाल्यास भारताची हार निश्चित आहे असे धक्कादायक विधान काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार युडी मिंझ यांनी केले आहे.
यादरम्यान त्यांच्यावर मोठी टीका होत असून त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर केलेल्या पोस्टवर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. यादरम्यान मिंझ यांनी आपल्या विधानावर आता सारवासारव केली आहे.

पोस्टनंतर युडी मिंझ म्हणाले अकाऊंट हॅक झाले!
दरम्यान आपले अकाऊंट हॅक झालेले आहे, त्यावर कोणतीही पोस्ट अथवा विचार व्यक्त होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करावे असे मिंड यांनी म्हणत झालेल्या प्रकाराबद्दल सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आता प्रश्न हा आहे की, त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट खरंच हॅक झाले आहे का...?
भारत पाकिस्तान युद्धावर काय म्हणाले मिंझ?
जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात दुःखाचे वातावरण आहे आणि लोक म्हणत आहेत की, पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे अशा स्थितीत छत्तीसगढ येथील काँग्रेस नेते आणि माझी खासदार युडी मिंझ यांनी वादग्रस्त पोस्ट फेसबूकवर केली आहे. यानंतर त्यांना ट्रोल केले जात आहे.
काय आहे ती वादग्रस्त पोस्ट?
जर भारत पाकिस्तानसोबत युद्ध करणार असेल तर भारताचा पराभव निश्चित आहे अशी ही पोस्ट युडी मिंझ यांच्या फेसबूक अकाऊंटवर होती, नंतर ती पोस्ट डिलिट झाली आहे.
युडी मिंझ यांच्या पोस्टमध्ये उल्लेख होता की, आज पाकिस्तानविरुद्ध निर्णायक युद्धाची भाषा जे लोक करत आहेत, त्यांनी समजून घ्यावे की, यावेळी भारताला पाकिस्तानसह चीनशीही लढावे लागेल. मग अशा परिस्थितीत भारताचा पराभव निश्चित आहे.
काय आहे सावरासावर केलेली पोस्ट
युडी मिंझ यांनी सारवासारव करताना म्हटले की... " प्रिय मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना कळवू इच्छितो की माझे Facebook खाते नुकतेच हॅक झाले आहे. या काळात, माझ्या खात्यावर काही क्रियाकलाप घडले आहेत जे माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि यामुळे काही गैरसमज झाले असावेत.
या गैरसोयीबद्दल मी मनापासून दिलगीर आहोत. मी या समस्येचे निराकरण करण्यासाठी Facebook सपोर्टशी संपर्क साधला आहे आणि माझे खाते सुरक्षित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहे. कृपया माझ्या खात्यातील कोणत्याही संशयास्पद संदेश, लिंक किंवा पोस्टकडे लक्ष देऊ नका किंवा त्यांना प्रतिसाद देऊ नका. तुमच्या सहकार्याबद्दल आणि समजून घेतल्याबद्दल धन्यवाद." असे त्यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications