धाड् आवाज अन्! सुवर्ण मंदिरात 'शिक्षा' भोगणाऱ्या अकाली दलाच्या नेत्यावर फायरिंग! बघा थराराचा व्हिडिओ

Firing on Akali Dal leader Sukhbir Singh Badal : अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या गेटवर शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. एका व्यक्तीने त्यांच्यावर फायरिंग केली. त्यात ते बालंबाल वाचले आहेत. सध्या ते सुरक्षित आहेत. या हल्ल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

सेवा करताना हल्ला, हल्लेखोर पकडला

प्राप्त माहितीनुसार, ज्यावेळी सुखबीर सिंह यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर तेथे उपस्थित लोकांनी लगेचच धाव घेतली. त्यामुळे घटनास्थळी लोकांनी हल्लेखोरावर नियंत्रण राखले. त्यामुळे अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल हे या घटनेत बालंबाल बचावले.

Firing on Akali Dal leader Sukhbir Singh Badal

हल्लेखोरावर सेवेकऱ्याची झडप

अकाली दल के नेता सुखबीर सिंह बादल हे सुवर्ण मंदिरात द्वारपाल म्हणून सेवा करत होते.त्यावेळी हा हल्ला झाला.ही सेवा त्यांना शिक्षेच्या स्वरुपात करायची होती. ते कार्य पार पाडतानाच हल्लेखोर आला त्याने आपल्याजवळील बंदुक काढली आणि बादल यांच्यावर रोखली. यानंतर पण कोणताही अनुचित प्रकार घडण्याआधी तेथे उपस्थित एका सेवकाने हल्लेखाराला पाहीले आणि त्याच्यावर त्याने झडप घातली.

सेवेकऱ्यामुळे वाचले बादल

ज्यावेळी सेवेकऱ्याने हल्लेखोरावर झडप घातली त्याचवेळी हल्लेखोराने बादल यांच्या दिशेने गोळी झाडली पण सेवेकऱ्याने घातलेल्या झडपेमुळे बंदुकीचा निशाणा चुकला आणि ती गोळी बाजूने गेली त्यामुळे बादल हे बालंबाल वाचले. या घटनेमुळे बादल यांना कोणतीही इजा झाली नाही. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.

आरोपीची ओळख पटली

गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीची ओळख पटली असून त्याचे नाव नारायण सिंह चौडा असे आहे. त्याचा खलिस्तानी चळवळीशी संबंध आहे. याआधी तो काही हिंसक कारवायातही सक्रीय होता अशी माहिती समोर येत आहे. त्याने सुखबीर सिंह बादल यांच्यावर गोळी का झाडली. यामागे त्याचा काय इरादा होता यासह पोलिस त्याच्याशी संबंधित नेटवर्कचाही शोध घेत आहेत.

बादल यांच्या पत्नी पोहचल्या सुवर्णमंदिरात

अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात एसएडी प्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर शिरोमणी अकाली दलाच्या खासदार आणि सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात पोहोचल्या.

काय म्हणाले पोलिस आयुक्त?

अमृतसरचे पोलिस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर म्हणाले, "...हल्लेखोर पकडला गेला आहे. तपासात सर्व काही उघड होईल... सखोल कट होता की नाही हे तपासात उघड होईल... हा हत्येचा प्रयत्न होता पण तो (सुखबीर सिंग बादल) पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावले.."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+