अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या गेटवर एका व्यक्तीने त्यांच्या गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल थोडक्यात बचावले असून ते सध्या सुरक्षित आहेत. हल्ला करणा-या व्यक्तीला गेटवर उपस्थित असलेल्या लोकांनी तातडीने पकडण्यात यश मिळालं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुवर्ण मंदिरात द्वारपाल म्हणून काम करत असताना अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. ही सेवा त्यांच्या धार्मिक शिक्षेचा एक भाग आहे. सेवेदरम्यान हा हल्लेखोर त्याच्याजवळ पिस्तुल घेऊन आला. हल्लेखोराने खिशातून शस्त्र काढून बादलकडे यांच्या दिशेने रोखले..

sukhbir singh badal

फोटो सौजन्य- पीटीआय

बादल यांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका सैनिकाने हल्लेखोराला पाहिले. सैनिकांने ताबडतोब हल्लेखोरावर झडप घालून रोखले. त्यामुळे सुखबीर सिंग बादल यांचे प्राण थोडक्यात बचावले आहे. या हल्लात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या घटनेनंतर हल्लेखोराला लगेचच पकडण्यात आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण घटनेत सुखबीर सिंग बादल यांना कोणतेही दुखापत झाली नाही.

हल्लेखोर नारायण सिंह याच्याकडून पोलिसांनी पिस्तूल हिसकावून घेतले. पोलिसांनी हल्लेखोर नारायण सिंग याला ताब्यात घेत तात्काळ पोलीस ठाण्यात नेले आहे. पोलिस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुखबीर बादल यांच्या सुरक्षेसाठी श्री हरमंदिर साहिबच्या आसपास सुमारे 200 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नारायण सिंह यांचे पिस्तूल हिसकावून घेणारा व्यक्तीही पंजाब पोलिसांचाच कर्मचारी आहे.

हल्लेखोर कोण?

नारायण सिंह चौधरी असे आरोपीचे नाव असून त्याचा खलिस्तानी कारवायांमध्ये सहभाग असल्याचा माहिती समोर येत आहे. पोलिसांनी ताबडतोब हल्लेखाराला अटक केली आहे. आरोपींने यापूर्वीही अनेक हिंसक घटनांशी त्याचा संबंध आहे. अधिकारी सुखबीर सिंग बादल यांना टार्गेट करण्यामागे त्यांचा काय हेतू आहे, याचा आता पोलिस तपास करत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+