Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात पुन्हा लागली आग; विकेंण्डच्या गर्दीमुळे प्रशासनाची तारांबळ

महाकुंभ मेळ्यात आज सायंकाळी चौथ्यांदा आग लागली. कुंभमेळ्यातील संकटाची मालिका थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. सेक्टर १९ येथील कल्पवासींच्या तंबूंना ही आग लागली. सुदैवाने त्यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. कल्पवासी निघून गेल्यानंतर रिकाम्या असलेल्या या तंबूंना ही आग लागल्याचे सांगितले जाते.

Mahakumbh Mela 2025

चौथ्यांदा लागली आग

महाकुभमेळा सुरु होऊन सुमारे २८ दिवस झाले आहेत. या २८ दिवसांत तीन वेळा आग लागण्याच्या घटना घडल्या. आगीची पहिली घटना १९ जानेवारीला घडली. त्यावेळी सेक्टर १९ मधील गीता प्रेस कॅम्पमधील अनेक तंबू जळून खाक झाले होते. यानंतर ३० जानेवारीला सेक्टर २२ मध्ये आग लागली. ज्यातही तंबू जळाले होते. ७ फेब्रुवारी रोजी सेक्टर-१८ मध्ये आग लागली ज्यामध्ये अनेक मंडप जळून खाक झाले. आता पुन्हा सेक्टर १९ मध्येच आगीची घटना घडली आहे.

चेंगराचेंगरीतही ३० मृत्यू

वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे उत्तर प्रदेश सरकार अडचणीत आले आहे. या आधी देखील तीन वेळा आग लागली आहे. मौनी अमावस्येच्या स्नानाच्या दरम्यान अचानक गर्दी वाढून झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे ३० भाविकांचा मृत्यू झाला होता. या प्रकारानंतरही युपी सरकारने अनेक कडक निर्बंध लावले. मात्र आगीच्या घटनेमुळे युपी सरकार पुन्हा अडचणीत सापडले आहे.

विकेंण्डमुळे गर्दी वाढली

विकेण्ड निमित्ताने सध्या लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविक गंगेत स्नान करीत आहेत. विकेण्डची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन महाकुंभमध्ये वाहनांचा प्रवेश रोखण्यात आला होता. प्रयागराजच्या सर्व सीमांवर बाहेरून येणारी वाहने रोखण्यात आली असून तेथून भाविकांना पायी चालत किंवा स्थानिक वाहनांनी यावे लागत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+