मोठा अपघात : वायुसेनेचे जग्वार फायटर जेट कोसळले; पायलटने पॅराशूटने वाचवले स्वतःचे प्राण, परंतु...
हरियाणाच्या पंचकुला येथे मोरनीजवळ बालदवाला गावांत वायूसेनेचे फायटर जेट विमान कोसळले. या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनाग्रस्त जग्वार जेट विमानाचा पायलट पॅराशुटच्या मदतीने खाली उतरण्यात यशस्वी ठरल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे. या अपघाताची माहीती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहचले. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश भारतीय वायू दलाने दिले आहेत. घटना स्थळी विशेष तज्ज्ञांची टीम देखील रवाना झाली आहे.

पायलटमुळे गावकऱ्यांचे प्राण वाचले
अपघातानंतर या फायटर जेटचे तुकडे दूरपर्यंत विखुरले गेले. हा अपघात एवढा भयंकर होता की, विमानाचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले. हे जग्वार फायटर जेट नियमित प्रशिक्षणाचे उड्डाण करीत होते. अंबाला गावा दरम्यान या जग्वार फायटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर ते दुर्घटनाग्रस्त झाल्याचे भारतीय वायूसेनेने म्हटले आहे. पायलटने विमानाला सुरक्षित रूपाने गावाच्या दाट वस्तीच्या हद्दीबाहेर नेण्यात यश आल्याने अनेक गावकऱ्यांचे प्राण वाचल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताच्या चौकशीचे आदेश
वायुसेनेने सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्सवर म्हटलेय की, "भारतीय वायुसेनेचे एक जग्वार फायटर जेट विमान सिस्टीममध्ये दोष निर्माण झाल्याने क्रॅश झाल्याचे म्हटले आहे.या अपघाताच्या घटनेचे सत्य बाहेर येण्यासाठी वायुसेने चौकशीचे आदेश दिले आहेत.












Click it and Unblock the Notifications