तुमच्या वडिलांना फादर्स डेच्या द्या या प्रेमळ शुभेच्छा! TOP 12 मराठी शुभेच्छा संदेश खास बाबांसाठी..
fathers day 2025 wishes shubhechha sandesh : जेव्हा आपल्यावर संकटं येतात ना तेव्हा तोंडातून एकच शब्द निघतो... तो म्हणजे बापरे..! बाप हे असं रसायन आहे जे तुमच्या सुरक्षेसाठी आणि काळजीसाठी धडपड करतं. ते स्वतःच्या इच्छा आकांक्षांना, पोटाला पिळ मारतो पण तुमच्या अपेक्षांना पंख देतो त्या पु्र्ण करण्यासाठी राब राब राबतो. मुलं मोठी व्हावी म्हणून बाप नेहमी लहान होतो...
परिस्थितीशी दोन हात करत मुलं आणि कुटुंबासाठी न थकता राबणारे हात हे बापाचेच असू शकतात. या वडिलांना मुलांकडून काहीच अपेक्षा नसते आपली मुलं मोठी व्हावी, खूप मोठी व्हावी अन् त्यांनी यशाचे शिखर गाठत एक चांगला माणूस बनावं हे सर्वच वडिलांना वाटते.. आपल्यापेक्षाही मोठ्ठं व्हावं हे जर कुणाला वाटत असेल तर तो बापच असतो..अशा वडिलांना फादर्स डेच्या खास शुभेच्छा आज देण्याचा योग आहे. आम्ही आपल्यासाठी टाॅप मराठी शुभेच्छा संदेश देत आहोत ते तुम्ही शेअरही करु शकता.

फादर्स डेच्या शुभेच्छा संदेश मराठीत (fathers day 2025 wishes shubhechha sandesh)
1. 'वडिलांचा सहवास एखाद्या आशीर्वादापेक्षा कमी नाही, बाबा, तुमचे आशीर्वाद तुमच्यासोबत कायम राहोत. फादर्स डेच्या शुभेच्छा!'
2. 'वडिलांच्या सावलीत प्रत्येक दुःख सोपे होते, फादर्स डेच्या शुभेच्छा!'
3. 'आयुष्याच्या मार्गात जेव्हा आधार नसतो, तेव्हा वडिलांचा हात धरणे पुरेसे असते. फादर्स डेच्या शुभेच्छा.'
4. 'तुम्ही माझ्यासाठी प्रत्येक आनंदाचा त्याग केला, माझ्या स्वप्नांना पंख दिले... तुम्ही माझे हिरो आहात, बाबा. फादर्स डेच्या शुभेच्छा.'
5. 'तुम्ही तिथे असताना मला भीती वाटत नाही किंवा काळजीही वाटत नाही', फादर्स डेच्या शुभेच्छा, बाबा.
6. 'बाबा, तुमच्यासारखे कोणीही नाही'. फादर्स डेच्या शुभेच्छा.
7. चंद्राने ताऱ्यांना विचारले, सर्वात प्रिय कोण आहे? बाबा, माझे बाबा.. फादर्स डेच्या शुभेच्छा पापा!
8. बाबा - माझा पहिला हिरो, पहिला मित्र आणि सर्वात मोठा मार्गदर्शक. फादर्स डे निमित्त मनापासून धन्यवाद!
9. फक्त आईच नाही तर वडीलही अमूल्य आहेत. ज्यांचे प्रेम कमी दिसते, पण त्याची खोली सर्वात जास्त असते. 'बाबांचे प्रेम त्या झाडाची सावली आहे, जे स्वतः जळते पण आपल्याला दिलासा देते. तुम्हाला सलाम' 'फादर्स डे'च्या शुभेच्छा
10. वडिलांचे हे प्रेम प्रत्येक प्रेमाचा पिता आहे, फादर्स डेच्या शुभेच्छा.
11. आईने जन्म दिला आणि वडिलांनी जीवन दिले, फादर्स डेच्या शुभेच्छा.
12. माझे वडील माझा अभिमान आहेत. माझे वडील माझा स्वाभिमान आहेत..... फादर्स डेच्या शुभेच्छा.












Click it and Unblock the Notifications