Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आता 3 हजारात पास, वर्षभर कुठेही प्रवास करा; टोल टॅक्सच्या त्रासाला करा बाय बाय! 7 हजारांची बचत होणार

FASTag pass : फास्ट टॅग प्रणातील नेहमी काही न् काही चांगले बदल होत आहेत. आता येत्या 15 ऑगस्ट 2025 पासून देशभरातील FASTag प्रणालीमध्ये आणखी काही मोठे बदल होणार आहेत. आता अवघ्या 3 हजार रुपयांमध्ये वार्षिक FASTag पास उपलब्ध करुन दिला जाणार आहेत. यामुळे टोल प्लाझावरील शुल्क प्रक्रिया आणखी सोपी आणि जलद होणार आहे.

FASTag pass for 3 thousand

टोलच्या त्रासातून कशी मिळणार मुक्ती! समजून घ्या..

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबद्दल माहिती दिली आहे. त्यानुसार, ही योजना 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. असे ते म्हणाले. जाणून घेऊ त्यांनी यासंदर्भात काय काय डिटेल्स माहिती दिली ते...

3 हजार रुपयांमध्ये वार्षिक FASTag पास उपलब्ध करुन दिला जाणार आहेत. हा एक ऐतिहासिक उपक्रम म्हणून, 15 ऑगस्ट 2025 पासून फास्टॅगवर आधारित वार्षिक पासची किंमत ₹3,००० आहे. हा पास सक्रिय झाल्यापासून एक वर्षासाठी किंवा 200 प्रवासांपर्यंत, जे आधी असेल ते वैध असेल.

FASTag पास विशेषतः गैर-व्यावसायिक खाजगी वाहनांसाठी (कार, जीप, व्हॅन इ.) डिझाइन केला आहे आणि देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड प्रवास करण्यास सक्षम करेल.

Take a Poll

FASTag वार्षिक पास सक्रिय करण्यासाठी/नूतनीकरणासाठी एक स्वतंत्र लिंक लवकरच हायवे ट्रॅव्हल अॅप आणि NHAI/MoRTH वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे प्रक्रिया सोपी आणि त्रासमुक्त होईल.

FASTag पास हे धोरण 60 किमीच्या परिघात असलेल्या टोल प्लाझांबद्दलच्या दीर्घकालीन चिंता अधोरेखित करेल आणि एकाच सोयीस्कर व्यवहाराद्वारे टोल पेमेंट अखंडित करेल.

FASTag वार्षिक पास धोरण लाखो खाजगी वाहन चालकांना प्रतीक्षा वेळ कमी करून, गर्दी कमी करून आणि टोल प्लाझावरील वाद दूर करून जलद, सुरळीत आणि चांगला प्रवास अनुभव प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे.

एक टोलसाठी पासमुळे लागणार फक्त 15 रुपये

टोल टॅक्सबद्दल मागील अनेक काळापासून लोकांची तक्रार होती. त्यामुळे केंद्र सरकारने यासंदर्भात एक निर्णय घेतला आहे. तीन हजार रुपयांत टोल पास वर्षभरासाठी जारी केला आहे. एका वाहनाला कमीत कमी दहा हजारांचा वर्षभरासाठी टोल द्यावा लागत होता पण आता तीन हजारांतच हा पास उपलब्ध केला आहे. त्यासाठी दोनशे टोल ओलांडावे लागणार आहे. प्रत्येकी एक टोल ओलांडला तर फक्त 15 रुपये भरावे लागणार आहेत. काही ठिकाणी टोल 50 ते 80 हजार रुपये टोल असतो तिथे तुम्हाला आता फक्त 15 रुपये भरावे लागतील. एकंदरीतच वर्षाला 7 हजारांची बचत आता होणार आहे असेही केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

एक्सवर जारी केला व्हिडिओ

आता कुठेही थांबायची गरज पडणार नाही, ही स्किम फक्त राष्ट्रीय हायवेसाठी आहे, राज्य महामार्गासाठी नाही. या योजनेमुळे नागरिकांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो मिळेल याची आम्हाला खात्री वाटते असेही त्यांनी एक्सवर पोस्ट केलेल्या आपल्या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+