Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फास्टॅगचे नवीन नियम तुम्हालाही माहित असले पाहिजेत, अन्यथा मोठा दंड भरावा लागेल, घ्या जाणून

Fastag New Rules 2025: फास्टॅग वापरणाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. फास्टॅगच्या नियमात मोठे बद्दल करण्यात आले आहेत. 17 फेब्रुवारीपासून हे नवीन नियम लागू झाले आहेत. या नियमांचे पालन न केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो.

नवीन नियमांनुसार जर तुमच्या फास्टॅगमध्ये कमी बॅलन्स असेल, पेमेंट करण्यास विलंब झाला असेल किंवा फास्टॅग ब्लॅकलिस्ट केला असेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल. टोल प्लाझावर वाहनांच्या लांब रांगा कमी व्हाव्यात आणि प्रवास आरामात करता यावा यासाठी सरकारने हे नियम बनवले आहेत. फास्टॅगचे नवीन नियम काय आहेत ते जाणून घेऊया.

Fastag New Rules 2025

फास्टॅगसाठी नवीन नियम काय आहेत?

सरकार आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार जर वाहनाचा फास्टॅग 60 मिनिटांसाठी निष्क्रिय राहिला किंवा टोल ओलांडल्यानंतर 10 मिनिटे सक्रिय झाला नाही, तर व्यवहार नाकारला जाईल. या प्रकरणात सिस्टम एरर कोड 176 सह पेमेंट नाकारेल.

याव्यतिरिक्त जर वाहनाने टोल प्लाझा ओलांडल्यानंतर 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळेत पैसे भरले तर फास्टॅग वापरकर्त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. टोल भरणे जलद आणि सोपे करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलं आहे. याशिवाय, वाद कमी करण्यासाठी आणि पेमेंट प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी चार्जबॅक प्रक्रिया आणि कूलिंग पीरियड सारख्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत.

आगाऊ रिचार्ज आवश्यक आहे

टोल पेमेंट सिस्टम अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. NPCI च्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2024 मध्ये FASTag व्यवहार 6% वाढून 38.2 कोटी झाले तर नोव्हेंबरमध्ये ही संख्या 35.9 कोटी होती. शिवाय FASTag व्यवहारांचे एकूण मूल्य देखील नोव्हेंबरमधील 6,070 कोटी रुपयांवरून 9% वाढून 6,642 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

फास्टॅगशी संबंधित नवीन नियमांबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे

कमी शिल्लक, उशिरा पेमेंट किंवा ब्लॅकलिस्ट: जर तुमच्या FASTag मध्ये पुरेशी शिल्लक नसेल, किंवा कोणत्याही कारणास्तव पेमेंटला उशीर झाला असेल किंवा तुमचा FASTag ब्लॅकलिस्ट झाला असेल, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. म्हणून, तुमच्या फास्टॅगमध्ये नेहमी पुरेसा बॅलन्स ठेवा आणि वेळेवर पेमेंट करा.

निष्क्रिय फास्टॅग: समजा तुम्ही टोल प्लाझामधून जाणार आहात पण टोल ओलांडण्यापूर्वी 60 मिनिटे आणि टोल ओलांडल्यानंतर 10 मिनिटे काही कारणास्तव तुमचा फास्टॅग सक्रिय (निष्क्रिय) नव्हता तर तुमचा टोल भरला जाणार नाही. सिस्टम एरर कोड 176 सह ते नाकारेल. म्हणून तुमचा फास्टॅग नेहमीच सक्रिय असल्याची खात्री करा.

उशिरा पैसे भरल्यास अतिरिक्त शुल्क: जर तुम्ही टोल प्लाझामधून जात असाल परंतु 15 मिनिटांच्या आत तुमच्या फास्टॅगमधून टोलची रक्कम कापली गेली नाही, तर तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. म्हणून टोल प्लाझामधून जाताच तुमचे पेमेंट त्वरित झाले आहे याची खात्री करा.

कमी बॅलन्स असल्यास कोण जबाबदार?: जर तुमच्या फास्टॅगमध्ये कमी बॅलन्स असेल आणि त्यामुळे टोल भरणे शक्य नसेल तर टोल ऑपरेटरला याची जबाबदारी दिली जाईल.

टोल नाक्यावर रिचार्ज सुविधा: पूर्वी जर तुमच्या फास्टॅगमध्ये कमी बॅलन्स असेल तर तुम्ही तो टोल बूथवरच रिचार्ज करू शकत होता. पण आता ही सुविधा बंद करण्यात आली आहे. नवीन नियमानुसार तुम्हाला फास्टॅग आगाऊ रिचार्ज करावे लागेल.

नवीन नियमांचा उद्देश: या सर्व नवीन नियमांची अंमलबजावणी करण्याचा मुख्य उद्देश टोल प्लाझावर वाहनांच्या लांब रांगा कमी करणे आहे. जेणेकरून प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रवास सोयीस्कर होईल. टोल भरण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+