मोठा निर्णय: अर्थसंकल्पापूर्वी मोदींचा मास्टरस्ट्रोक; इथेनाँलच्या किंमती वाढल्या
मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. हा अर्थसकंल्प सादर करण्यापूर्वीच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. आता इथेनॉलच्या किंमती वाढवण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. इथनॉल खरेदीच्या सुधारीत किमती 1 नोव्हेंबर 2024 पासून ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत लागू राहणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

नेमकं काय होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सची नुकतीच बैठक झाली. त्यात इथेनॉल खरेदीसाठी सुधारित किमतींना मंजुरी देण्यात आली. या किमती 1 नोव्हेंबर 2024 पासून ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत लागू राहतील. या निर्णयासह इथेनॉल मिश्रित पेट्रोल प्रोग्रामद्वारे सी-हेवी मोलॅसिसची एक्स-मिल किंमत 56.58 रुपये प्रति लीटरवरून 57.97 रुपये प्रति लीटर झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. याशिवाय कच्च्या तेलावरील देशाचे अवलंबित्व कमी होऊन परकीय चलनाची बचत होण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांना होणार थेट फायदा
या निर्णयाबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाचा फायदा थेट शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, देशात इथेनॉलचा अधिकाधिक वापर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकार हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल करत आहे. केंद्रातील मोदी सरकारने सी-हेवी मोलॅसीसमधून मिळणाऱ्या इथेनॉलच्या एक्स-मिल किंमतीत 1.69 रुपयांनी वाढ करून 57.97 रुपये प्रति लिटर करण्यास मान्यता दिली. उसाचा रस, साखर आणि साखरेच्या पाकापासून उत्पादित बी- हेवी मोलॅसेस आणि इथेनॉलच्या किमती अनुक्रमे 60.73 रुपये प्रति लिटर आणि 65.61 रुपये प्रति लिटरवर कायम आहेत.












Click it and Unblock the Notifications