Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

लग्नानंतरही विवाहबाह्य संबंधात या क्षेत्रातील लोक सर्वात पुढे! सर्व्हेतून धक्कादायक माहिती आली समोर

Extra marital affairs : लग्न आणि त्यानंतरचा सुखाचा संसार ही गोष्ट खूपच आनंददायी आणि सुखकर. पण या सुखावर विरजण पडणाऱ्या गोष्टी जर घडत असतील तर तो संसार उद्धवस्त होण्यास वेळ लागत नाही. अनेक जण आपल्या संसारात अनेक अपेक्षा ठेवतात, ज्या आपला पार्टनर पुर्ण करत नसेल तर त्या गोष्टी समजून घेणे दुरच पण पार्टनरलाच धोका देऊन अफेअर करणे, इतर व्यक्तींशी संबंध, विवाहबाह्य संबंध ठेवण्याचे प्रमाण हल्ली वाढताना दिसत आहे.

Extra marital affairs

एका धक्कादायक सर्व्हेमधून असे समोर आले आहे की, काही विशिष्ट व्यवसायांमधील लोक लग्नानंतरही इतर व्यक्तींसोबत संबंध ठेवण्यात (Extra-marital affair) सर्वात पुढे आहेत. 'एशली मॅडिसन' (Ashley Madison) या डेटिंग वेबसाइटने केलेल्या या सर्व्हेमध्ये १००० हून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. या सर्व्हेनुसार, व्यक्तीचा व्यवसाय त्याच्या 'बेवफाई' (Infidelity) करण्याच्या प्रवृत्तीवर परिणाम करू शकतो. बोल्ड स्कायने याबाबत वृत्त दिले.

कोणत्या व्यवसायातील लोक 'अफेअर' मध्ये आघाडीवर?

या सर्व्हेनुसार, खालील व्यवसायातील लोक विवाहबाह्य संबंधात सर्वात पुढे आहेत:

१. ट्रेड्स (Trades):

यामध्ये बांधकाम (Construction), प्लंबिंग (Plumbing), वेल्डिंग (Welding) यांसारख्या नोकऱ्यांचा समावेश आहे. या गटात २९ टक्के पुरुष आणि ४ टक्के महिला या गटात आढळल्या. म्हणजेच, या क्षेत्रातील पुरुष 'बेवफाई' करण्यात सर्वात आघाडीवर आहेत.

२. मेडिकल सेक्टर (Medical Sector):

डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट यांसारख्या व्यावसायिकांचा समावेश असलेल्या या क्षेत्रात २३ टक्के महिला आणि ५ टक्के पुरुष या गटात होते. अनियमित कामाचे तास आणि ताण हे एक कारण असू शकते. मात्र, या सर्व्हेनुसार, अफेअर ठेवण्यात महिला आघाडीवर दिसतात

३. आयटी सेक्टर (IT Sector):

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्याही लक्षणीय होती.तांत्रिक कामाचा ताण आणि कामाचे स्वरूप हे एक कारण मानले जाते.

४. उद्योजक (Entrepreneurs):

स्वतःचा व्यवसाय सुरू करणारे आणि चालवणारे लोक. सततची मेहनत, नवीन लोकांशी संपर्क आणि कुटुंबाला कमी वेळ देणे यामुळे नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो.

५. आर्थिक आणि शिक्षण क्षेत्र (Finance & Education):

आर्थिक क्षेत्रातून (Finance) ८ टक्के महिला आणि ९ टक्के पुरुष आढळले, शिक्षण क्षेत्रातून (Education) सुमारे ४ टक्के लोक (शिक्षक, व्याख्याते, प्रशासक) होते.

६. मार्केटिंग, सोशल वर्क आणि हॉस्पिटॅलिटी (Marketing, Social Work & Hospitality): मार्केटिंग आणि कम्युनिकेशनमध्ये काम करणाऱ्यांना लोकांशी सतत संपर्क साधावा लागतो, ज्यामुळे अशी प्रकरणे घडू शकतात. यात ४ टक्के महिला आणि ८ टक्के पुरुष या गटात आढळले.

सर्वात कमी 'अफेअर' करणारे प्रोफेशन्स

राजकारण, कला आणि कायदेशीर क्षेत्र या यादीत राजकारणाचा क्रमांक सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सर्वेक्षण केलेल्या पुरुष आणि महिलांपैकी फक्त १ टक्केच राजकारणात सहभागी होते. शिवाय, शेती, कला, संस्कृती, कायदेशीर क्षेत्र आणि मनोरंजन क्षेत्रात खूप कमी लोक आढळले. याचा अर्थ असा की या क्षेत्रांमध्ये सर्वात कमी प्रकरणांची नोंद झाली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+