राजीनाम्याच्या 53 दिवसांनी अखेर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आले समोर! कुठे होते इतक्या दिवस? वाचा
ex Vice President Jagdeep Dhankhar came forward after 53 day : देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एकाएकी राजीनामा दिला आणि त्यानंतर ते समोर आले नाहीत, आज राजीनाम्याच्या ५३ दिवसानंतर ते समोर आले आहेत. नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृ्ष्णन यांच्या शपथसोहळ्यात ते दिसून आले आहेत. यामुळे त्यांच्याबद्दलच्या चर्चा आता थांबतील अशी चिन्हे आहेत.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याचे कारण आरोग्याची समस्या असे म्हटले आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी जाहीररित्या काहीही सांगितले नाही आणि कुणाशी भेटले नाही, हा मुद्दा घेत विरोधी पक्षाने भाजपप्रणित एनडीए सरकारला प्रश्न विचारले होते आणि आरोप केले होते की, माजी उपराष्ट्रपती धनखड यांना राजीनाम्यासाठी त्यांच्यावर दबाव होता, या प्रश्नांची उत्तरे समोर येत आहेत.
भाजपवर विरोधकांनी केले होते आरोप
विरोधकांमध्ये खासकरुन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहूल गांधींसह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी सवाल केले होते. यासह भाजपच्या दबावामुळे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला असा आरोपही विरोधकांनी केला होता. मात्र, या आरोपाबद्दल अद्यापही खुलासा झालेला नाही, कारण जगदीप धनखड यावर अजून काहीही बोलले नाहीत, वा त्यांनी स्पष्टीकरणही दिले नाही.
इतक्या दिवस कुठे होते जगदीप धनखड?
जगदीप धनखड यानी २१ जुलै २०२५ रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर ते समोर आले नाहीत. त्यानंतर ५३ दिवसांनी ते भारताचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधी समारंभात उपस्थित राहीले. वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, इतक्या दिवस जगदीप धनखड हे दिल्लीतच राहत होते. शपथविधी समारंभात धनखड हे आले ही गोष्ट खास चर्चेची राहीली. माजी उपराष्ट्रपती धनखड हे भाजपचे नेते वैंकय्या नायडू यांच्याजवळ बसले होते, त्यांच्याशी धनखड हे चर्चा करताना दिसले. त्यांच्या बाजूला एक सीट सोडून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू होते.
फार्महाऊसवर राहत आहेत माजी उपराष्ट्रपती धनखड!
राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे दिल्लीत राहत होते त्यांनी उपराष्ट्रपती भवनही रिकामे केले आणि सध्या ते तात्पुरते छतरपूरच्या गडैपूर भागात राहत आहेत. तिथे अभय सिंह चौटाला यांच्या फार्म हाऊसवर ते थांबलेले आहेत. धनखड यांना जोपर्यंत सरकारी निवासस्थान दिले जात नाही तोपर्यंत ते येथेच राहतील असेही वनइंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications