ज्योती मल्होत्रा प्रकरणी YouTuber प्रियंका सेनापतीची एंट्री! तिचा पाकिस्तानशी संबंध काय? घ्या जाणून
Espionage case : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरियाणातील हिसार येथील प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक झाली. त्यानंतर तिची कसून चौकशी सुरु झाली असतानाच या प्रकरणाच्या फांद्या ओडिशात पोहोचल्या आहेत.
केंद्रीय गुप्तचर संस्था इंटेलिजेंस ब्युरो (IB) आणि ओडिशाच्या पुरी पोलिसांनी संयुक्त कारवाईत पुरी येथील युट्यूबर प्रियंका सेनापतीची चौकशी सुरु केली आहे.

काय आहे ज्योती मल्होत्रावर आरोप
ज्योती मल्होत्रा, जी तिच्या व्लॉग्स आणि सोशल मीडिया कंटेंटसाठी ओळखली जात होती, तिच्यावर भारतीय सैन्य आणि मोक्याच्या ठिकाणांशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप आहे.
अनेक महिन्यांच्या देखरेखीच्या आणि पुराव्याच्या आधारे, तिला आणि इतर सहा संशयितांना अटक करण्यात आली. या अटकेमुळे सायबर हेरगिरी नेटवर्कचा उलगडा झाल्याचे मानले जात आहे. यामुळे सोशल मीडिया आणि डिजिटल प्रभावकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
श्रीमंत होण्याची लालसा...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सप्टेंबर 2024 मध्ये, ज्योतीने ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिर आणि आसपासच्या सरकारी संकुलांना भेट दिली. या काळात तिने या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ बनवले, ज्यावरून असा संशय आहे की हा डेटा डिजिटल माध्यमातून पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या एजंटना पाठवण्यात आला होता. या प्रवासादरम्यान, तो पुरीच्या स्थानिक युट्यूबर प्रियंका सेनापतीच्या संपर्कात असल्याचा संशय आहे.
प्रियंका सेनापतीचा रोल काय?
पाकिस्तानला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योतीच्या संपर्कात प्रियंका आल्याचे बोलले जात आहे. यातच तपास यंत्रणांना संशय आहे की या दोघींमध्ये व्यावसायिक किंवा वैयक्तिक पातळीवर काही संबंध होते. या संदर्भात, पुरी पोलिसांसह गुप्तचर विभागाने प्रियांकाची चौकशी केली आहे.
लाईव्ह आली प्रियांका सेनापती ..
प्रियंका सेनापतीचे स्पष्टीकरण तपासात आल्यानंतर, प्रियांका सेनापती सोशल मीडियावर लाईव्ह आली आणि आपली भूमिका तिने स्पष्ट केली आहे.
काय आहे प्रियांका सेनापतीची भुमिका?
प्रियांका सेनापती हिने ज्योतीशी संबंधित काही खुलासे केलेले आहेत. ज्याची माहिती तिने आपल्या लाईव्हमध्ये दिली. ती म्हणाली, "ज्योती ही माझी फक्त एक YouTube सहकारी होती. मला तिच्या कोणत्याही बेकायदेशीर कृत्यांबद्दल माहिती नव्हती. जर मला माहित असते की ती शत्रू देशासाठी हेरगिरी करत आहे, तर मी कधीही तिच्याशी संपर्क साधला नसता."
प्रियांका म्हणाली माझे ज्योतीशी व्यावसायिक नाते..!
प्रियांका सेनापती म्हणाली, ज्योती मल्होत्रासोबत माझे नाते फक्त व्यावसायिक पातळीवरचे होते आणि ज्योतीशी संबंधित बातमीने मला वैयक्तिकरित्या धक्का बसला आहे. मी तपासात पूर्ण सहकार्य करेल." असेही ती म्हणाली.
कोण आहे ज्योती मल्होत्रा?
हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योतीचे इंस्टाग्राम तसेच यूट्यूबवर @travelwithjo1 नावाने अकाउंट आहे. यामध्ये तिने पाकिस्तान प्रवासाचे अनेक व्हिडिओ आणि रील पोस्ट केली आहेत. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील एका पोस्टमध्ये इश्क लाहोर असे देखील लिहिलेले आहे.
ज्योतीच्या इन्स्टाग्राम हँडलवर पाकिस्तानशी संबंधित रील्स, पोस्ट
ज्योतीच्या इन्स्टाग्राम हँडलवर पाकिस्तानशी संबंधित अनेक रील्स आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेले आहेत. पाकिस्तानमध्ये बनवलेल्या प्रवासवर्णनाशी संबंधित रील्स आणि व्हिडिओंद्वारे ज्योतीने तेथील अनेक सकारात्मक गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न सातत्याने केला गेला. अशा परिस्थितीत, ज्योतीवर सोशल मीडिया इन्फ्लुयएसंर म्हणून तिच्या प्रभावाचा वापर गुप्तचर आणि प्रचारासाठी परदेशी एजंट्सकडून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications