सावधान..भारतात मंकीपॉक्सची एंट्री?,विदेशातून आलेल्या व्यक्तीस केले क्वॉरंटाईन
Monkeypox : आरोग्य विभागाकडून एक मोठी माहिती देण्यात आलेली आहे. ही माहिती देशवासियांची चिंता वाढवणारी आहे. ज्या प्रमाणे कोविड काळात सातत्याने वाढणाऱ्या कोविड रुग्णांच्या संख्येमुळे टेन्शन वाढलं होत. त्याचप्रमाणे आता मंकिपॉक्सच्या आजाराबाबतची चिंताग्रस्त बातमी समोर आली आहे.
भारतात मंकीपॉक्सचा आणखी एक संशयित रुग्ण आढळून आला आहे. आरोग्य विभागाकडून मंकिपॉक्सच्या संसर्गासारखी लक्षणे असलेल्या तरुणाची ओळख पटवण्यात आलेली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संसर्गाची तपासणी करण्यासाठी नमुने पाठवण्यात आले आहेत. सध्या चिंतेचे कारण नाही, तरी देखील संशयित रुग्णाला विलिगीकरणात ठेवण्यात आलेले आहे.

मंकीपॉक्सच्या ताज्या प्रकरणाबाबत आरोग्य मंत्रालयाने सोमवारी एक निवेदन जारी केले. ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, ज्या व्यक्तीमध्ये संशयास्पद संसर्ग आढळला त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासण्यात आली. तपासादरम्यान, संक्रमित व्यक्ती नुकताच परदेशात गेल्याचे समोर आले.
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, "एमपॉक्स (मंकीपॉक्स) संक्रमणाचा अनुभव घेणाऱ्या एका देशातून नुकताच प्रवास केलेला तरुण पुरुष रुग्ण, एमपॉक्सचा संशयित रुग्ण म्हणून ओळखला गेला आहे. रुग्णाला नियुक्त रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णाचे नमुने घेतले जात आहेत. एकटा आहे आणि त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.












Click it and Unblock the Notifications