राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणुकीची तारीख ठरली, मतदान कधी?, जाणून घ्या-संपूर्ण वेळापत्रक
Rajyasabha Election 2024 : भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी निवडणूक तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुक आयोगाच्या अधिसूचनेनुसार, राज्यसभेच्या जागांसाठी 20 डिसेंबर रोजी निवडणुका होणार आहेत आणि त्याच दिवशी निकाल देखील घोषित केले जातील.
कोणत्या राज्यातील जागांचा समावेश?
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यसभेच्या ज्या जागांवर निवडणुका होणार आहेत, त्यापैकी 3 जागा आंध्र प्रदेशातील आहेत. याशिवाय पश्चिम बंगाल, हरियाणा आणि ओडिशामध्ये प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे. विद्यमान खासदारांनी राजीनामा दिल्यानंतर या सर्व जागा रिक्त झाल्या आहेत.

निवडणूक आयोगाने 24 डिसेंबरपूर्वी राज्यसभेच्या रिक्त जागांवर निवडणुका घ्यायच्या आहेत. त्यासाठी आयोगाने संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. ECI 3 डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीशी संबंधित अधिसूचना जारी करेल.
नामांकनाची अंतिम तारीख 10 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. 11 डिसेंबर रोजी नामनिर्देशनाची छानणी होणार आहे. 13 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकतात. 20 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.












Click it and Unblock the Notifications