बोगस मतदारांची खैर नाही; 'त्या' २२ कोटी मतदारांची होणार पडताळणी, निवडणूक आयोगाने उचलले पाऊल
मतदार याद्या सुरळीत करण्यासाठी निवडणूक आयोग राष्ट्रीय पातळीवर एक मोठी मोहिम हाती घेणार आहे. त्यासाठी मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याबाबत करार झाला आहे. आत्तापर्यंत आयोगाने ६६ कोटी मतदारांचे आधार एपिक क्रमांक मतदान कार्डला लिंक केले आहेत. अद्यापही २२ कोटी मतदारांचे आधार क्रमांक उपलब्ध नाहीत. या मतदारांना मतदार यादीतून डुप्लिकेशन काढून टाकण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरु होणार आहे.

मतदार यादी अपडेट करणार
मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी आयोगाने विशेष पाऊले उचलली आहेत. मतदार यादी अपडेट करण्यासाठी आता प्रत्येक मतदार केंद्र निहाय राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची मदत घेण्यात येणार आहे. त्याआधारे बोगस मतदार ओळखले जातील. मतदार यादी प्रकाशित करण्यापूर्वी राजकीय पक्षांचे आक्षेप आणि हरकती विचारात घेण्यात येईल. स्थानिक मतदार केंद्र, जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर छाननी झाल्यानंतरच अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येईल.
काय होती अडचण?
निवडणूक काळात निवडणूक आयोगाकडे अनेक तक्रारी येतात. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी मतदार केंद्रनिहाय व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदार यादी तयार करणे, मतदाना दरम्यान ईव्हीएमची व्यवस्था, देखभाल करणे, मॉक पोल, मतदानाचा टक्का याविषयीच्या ज्या तक्रारी करण्यात येणार त्याची इत्यंभूत माहिती घेऊन ती सोडवण्यात येणार आहे. मतदान केंद्र अधिकारी आणि मतदान केंद्र एजंट यांना यासाठी लागलीच प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण
मतदार केंद्र अधिकारी आणि एजंट यांना प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यात कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चूका समोर आल्या आहेत. इतकेच नाही तर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सुद्धा निवडणूक नियम आणि प्रक्रियेसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मतदार केंद्रावर काम करणाऱ्या 50 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातून सर्वाधिक तक्रारी
मतदार यादीत गडबड असल्याच्या अनेक तक्रारी देशभरातून करण्यात आल्या होत्या. त्यात सर्वाधिक तक्रारी महाराष्ट्रातून करण्यात आल्या होत्या. देशभरातून 89 तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या सर्व महाराष्ट्रातील होत्या. आता या तक्रारींचे निरसन करण्यासाठी त्यावर उपाय करण्यात येणार आहे. आधार व मतदानकार्ड एकमेकांना जोडण्याबरोबरच होम टू होम जाऊन मतदारांची खात्री करण्यात येणार आहे.












Click it and Unblock the Notifications