Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Sankashti Chaturthi 2025 :आज एकदंत संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या- पूजेची वेळ अन् चंद्रदर्शन कधी होईल?

Sankashti Chaturthi 2025 : चतुर्थी ही तिथी भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, एकदंत संकष्टी चतुर्थी व्रत ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाते. यावर्षी एकदंत संकष्टी चतुर्थी 16 मे 2025, शुक्रवारी अर्थात आज आहे. या दिवशी भगवान श्री गणेशाच्या एकादंत रूपाची पूजा केली जाते.

भगवान एकदंत हे गणेशाचे अष्टविनायक रूपांपैकी एक रुप मानले जाते. या दिवशी संध्याकाळी भगवान चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतर व्रत पूर्ण होते असे मानले जाते. जाणून घ्या एकदंत संकष्टी चतुर्थी पूजा मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ कधी आहे.

Sankashti Chaturthi 2025

गणपतीला एकदंत नाव कसे पडले?

एकदंत गणेशाचा शब्दशः अर्थ आहे, एक दात असलेला गणेश. पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान परशुरामांनी भगवान गणेशावर कुऱ्हाडीने प्रहार केला. तेव्हा त्यांचा एक दात तुटला. तेव्हापासून गणरायांना एकदंत म्हणून ओळखले जाऊ लागले. एकदंत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजेसाठी हे आहेत शुभ काळ!

  • ब्रह्म मुहूर्त- 04:06 AM ते 04:48 AM
  • अभिजित मुहूर्त - सकाळी 11:50 ते दुपारी 12:45 पर्यंत
  • विजय मुहूर्त - दुपारी 02:34 ते दुपारी 03:28 पर्यंत
  • संधिप्रकाश वेळ - संध्याकाळी 07:04 ते 07:25
  • संध्याकाळी - 07:06 ते 08:08
  • अमृत ​​काल- सकाळी 09:11 ते सकाळी 10:55 पर्यंत.

एकदंत संकष्टी चतुर्थी व्रत तिथी आणि चंद्रोदय वेळ

वैदिक कॅलेंडरनुसार, चतुर्थी तारीख दिनांक 16 मे 2025 अर्थात आज आहे. पहाटे 04:02 ते 17 मे 2025 रोजी पहाटे 05:13 पर्यंत असेल. संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय रात्री 10:39 वाजता होईल.

एकदंत संकष्टी चतुर्थीचे महत्व

लहान मुलांसाठी एकदंत संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान श्री गणेशाची योग्य प्रकारे पूजा केल्याने मुलांचे आयुष्य वाढते. मुलाशी संबंधित त्रासांपासून मुक्तता मिळते आणि जीवनात आनंद, समृद्धी आणि कल्याण येते.

या मंत्राचा वापर करून करा गणरायाची पूजा!

1. कदंताय विद्‍महे, वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात।।

2. ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा ॥

3. ॐ गंग गणपतये नमो नमः

4. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा।।

5. एकदंताय शुद्धाय सुमुखाय नमो नमः। प्रपन्न जनपालाय प्रणतार्ति विनाशिने।।

6. ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये। वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नमः॥

7. ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा॥

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+