Eighth Pay Commission : गुड न्यूज सरकारी नोकरदारांचा पगार वाढणार; आठवा वेतन आयोग लवकरच लागू होणार

Eighth Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. कॅबिनेट बैठकीत आठव्या वेतन आयोगासंदर्भात हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता हा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ होणार आहे.

दरम्यान, हा वेतन आयोग कधी लागू होणार आणि कधी पगारात वाढ होणार यासंदर्भात माहिती लवकरच समोर येणार आहे.

Eighth Pay Commission

सातव्या वेतन आयोगानंतर आता सरकारी कर्मचारी , अधिकाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची प्रतिक्षा आहे. हा वेतन आयोग कधी आणि केव्हापासून लागू होणार याबाबत मात्र अजून स्पष्ट करण्यात आले नाही.

काय म्हणाले केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव?

आठव्या वेतन आयोगासंदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. आठवा वेतन आयोगात कोणत्या श्रेणीला किती पगारवाढ होणार किंवा किती फायदा होणार हे काही दिवसांतच कळणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार,केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगार सध्या मिळत आहे. दर दहा वर्षांनी वेतन आयोग लागू केला जातो. यंदा 2014 नंतर दहा वर्षांनी म्हणजेच 2025 मध्ये वेतन आयोग लागू होणार आहे.

सातव्या वेतन आयोगाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन रचना, भत्ते आणि पेन्शनमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, यामुळे वेतन समानता निश्चित झाली आणि सक्रिय कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारक दोघांनाही फायदा झाला आहे. यानंतर आता आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संभाव्य अंमलबजावणी कधी होईल याची उत्सुकता आहे.

दर दहा वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना

केंद्रीय वेतन आयोगांची स्थापना दर १० वर्षांनी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी, भत्ते आणि फायद्यांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यात बदल करण्याची शिफारस करण्यासाठी केली जाते. हे आयोग महागाई आणि आर्थिक परिस्थिती यासारख्या घटकांना विचारात घेतात.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 28 फेब्रुवारी 2014 रोजी स्थापन केलेल्या 7 व्या वेतन आयोगाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी आपला अहवाल सादर केला आणि 1 जानेवारी 2016 पासून शिफारशी लागू केल्या.

या वेळेनुसार, आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची अपेक्षा आहे. मागील आयोगांप्रमाणेच, यामुळे पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (डीए) आणि महागाई मदत (डीआर) मध्ये समायोजनासह पगारात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+