Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले, लोकांनी घर आणि कार्यालायच्या बाहेर पडत सुरक्षितस्थळी घेतली धाव

अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर 5.9 तीव्रतेचा भूकंप झाला आहे, ज्याचे परिणाम भारताच्या जम्मू-काश्मीर परिसरात जाणवले. काश्मीर खोऱ्यातील नागरिकांनी भूकंपाचे हलके झटके अनुभवले, ज्यामुळे लोक घाबरून कार्यालये आणि घरांबाहेर पडले आहेत. आज शनिवारी दुपारच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे केंद्र 86 किलोमीटर खोलीवर असल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (NCS) सांगितलं आहे.

earthquake

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमेवर 36.13 अंश उत्तर आणि 71.38 अंश पूर्व अशा स्थानावर होते. हा भूकंप 86 किलोमीटर खोलीवर झाला, ज्याची तीव्रता रिक्टर स्केलवर 5.9 नोंदवण्यात आली.

या भूकंपाचे झटके काश्मीर खोऱ्यातील श्रीनगर, बारामुला, आणि अनंतनाग यांसारख्या भागांत जाणवले आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाची लहर इतकी प्रबळ होती की लोकांनी त्वरित सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला.

भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमध्ये असले तरी त्याचे परिणाम भारताच्या उत्तरेकडील भागांमध्ये जाणवले. विशेषतः जम्मू-काश्मीरमधील पर्वतीय भागात हे झटके स्पष्टपणे जाणवले, परंतु अद्याप कोणत्याही नुकसानाची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून ठेवले असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांना सतर्क केले आहे.

काश्मीर खोऱ्यातील नागरिकांनी भूकंपाचे झटके अनुभवताच घाबरून कार्यालये, शाळा, आणि घरांबाहेर धाव घेतली. श्रीनगरमधील कार्यालयांमधील कर्मचारी आणि नागरिकांनी तातडीने बाहेर पडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. झटके इतके प्रबळ होते की काहींनी आपले रोजचे काम सोडून मैदानात सुरक्षितस्थळी दाखल झाले आहेत.

भूकंपाच्यावेळी काय काळजी घ्यावी

- एनडीआरएफच्या सल्ल्यानुसारव भूकंपाच्या वेळी घाबरण्याऐवजी मोकळ्या जागेत आश्रय घ्यावा.

- मोकळ्या जागेत उभे राहा जिथे इमारती, झाडे, वीजवाहिन्या नाहीत, अश्या ठिकाणी थांबा.

- मोठमोठ्या इमारतींच्या जवळ उभे राहू नका, कारण भिंती किंवा काच कोसळण्याचा धोका असतो.

- पुलाखाली किंवा उंच इमारतीजवळ थांबू नका.

- भूकंपाचे झटके बंद झाल्यावर रस्त्याची स्थिती तपासून मगच पुढे निघा.

- क्षतिग्रस्त किंवा तुटलेल्या पुल, ब्रीज किंवा रस्त्याचा वापर करू नका.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+