Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोन्याला विक्रमी झळाळी; भाव प्रथमच गेला ८० हजारांच्या पुढे

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर सोने प्रथमच विक्रमी भावांत पोहोचले. डोनाल्ड ट्रम्प यांनी एकाच दिवशी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे सोन्याचे भाव वाढल्याचे सांगितले जाते. बुधवारी एकाच दिवसांत सोने प्रति दहा ग्रॅम ८०० रुपये तर चांदी प्रतिकिलो ३०० रुपयांनी महागली.

A record high for gold

सोन्याला आली झळाळी

सोन्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे डॉलर इंडेक्सची माघार झाली. सोन्याच्या दराने विक्रमी झेप घेतली. सोने प्रथमच ८० हजारांच्या पार गेले. गुरुवारी सोने प्रती दहा ग्रॅम ८० हजार ४०० रुपयांपर्यंत गेले. जीएसटीसह एका तोळ्यासाठी आता ८२ हजार ८१२ रुपये मोजावे लागणार आहेत. गेल्या २२ दिवसांत सोने ३ हजार ५०० रुपयांनी वाढले.

चांदीही महागली

सोन्याप्रमाणे चांदीच्या भावातही एका दिवसांत ३०० रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव आता १२ हजारांच्या पुढे गेला आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या वेळी सोन्याचे भाव ८० हजाारांच्या घरात गेले होते. तर चांदी प्रतिकिलो ९७ हजार ५०० रुपयांवर गेली होती.

काय आहेत कारणे

अमेरिकेच्या निर्णयांमुळे देशात अस्थिरतेचे वातावरण तयार झाल्याचे सांगितले जात आहे. त्याशिवाय सोन्याच्या व चांदीच्या भाववाढीला इतरही कारणे अनेक कारणे आहेत. डाँलरही आता तेजीत आला आहे. याचा परिणाम मात्र सराफ बाजारावर होणार आहे. लग्नसराईत सोन्याची किरकोळ विक्रीत घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोने लाखांवर जाणार

जागतिक अस्थिरतेमुळे सोन्याला चमक आल्याचे काहींचे मत आहे. ही चमक अजून वाढणार आहे. सोने अंदाजे प्रति दहा ग्रॅम एक लाखांवर जाईल, असे सांगितले जात आहे. चांदीही प्रतिकिलो एक लाखांवर पोहोचली आहे. सोन्याचे दर कमी झाल्यास ती संधी समजून खरेदी करावी, असे सांगितले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+